हे 10 शेअर्स देतील दमदार परतावा; जाणून घेऊया शेअर बाजाराचा मूड

अमेरिकन डॉलर इंडेक्समध्ये झालेली वाढीने शेअर बाजारात चिंतेचे वातावरण होते.
 HDFC Life Share Market Update
HDFC Life Share Market Updatesakal
Updated on

भारतीय बाजारात सोमवारची सुरुवात कमजोर झाली आणि दिवसभर ही कमजोरी अशीच राहीली. मोठ्या प्रमाणात विक्री, डॉलरची मजबूती, महागाई वाढण्याची भीती आणि मध्यवर्ती बँकांनी कठोर आर्थिक धोरण स्वीकारण्याची शक्यता यामुळे बाजार घसरणीसह बंद झाला. शेवटी सेन्सेक्स 364.91 अंकांनी म्हणजेच 0.67 टक्क्यांनी घसरून 54,470.67 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 109.40 अंकांनी म्हणजेच 0.67 टक्क्यांनी घसरून 16,301.85 वर बंद झाला. (share market pre analysis best stock to buy today)

 HDFC Life Share Market Update
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही! असे आहेत दर

रुपायाची वाढती कमजोरी, जागतिक स्तरावर वाढलेले व्याजदर आणि चीनमध्ये लॉकडाऊन वाढल्याने सोमवारी बाजारात कमजोरी कायम राहिल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. व्याजदरात झालेली वाढ आणि यूएस ट्रेडर्सच्या उत्पन्नात झालेल्या वाढीमुळे अमेरिकन डॉलर इंडेक्समध्ये झालेली वाढीने शेअर बाजारात चिंतेचे वातावरण होते.

 HDFC Life Share Market Update
देशात सर्वात महाग पेट्रोल विकलं जातंय महाराष्ट्रात, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

बाजाराने खालच्या पातळीवरून रिकव्हरी पाहिल्याचे मार्केट एक्सपर्ट मनीष शाह म्हणाले. अशा स्थितीत निफ्टी ग्रीन कँडलसह बंद झाला आहे. निफ्टीने एक बुलिश हार्मोनिक पॅटर्न तयार केला आहे जो तेजीचे संकेत देत आहे. निफ्टी महत्त्वाच्या सपोर्ट झोनमध्ये दिसत असून तो या झोनमध्ये स्थिरावताना दिसत आहे. आता वरच्या दिशेने जाण्यासाठी निफ्टीला 16,490 च्या वर राहावे लागेल. खाली निफ्टीला 16100 वर सपोर्ट दिसत आहे. सध्या शेअर बाजार ओव्हरसोल्ड झाला आहे. इथूनही जलद रिकव्हरी दिसू शकते. म्हणून, शॉर्ट साइडवर जास्त पोझिशन्स घेणे टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

 HDFC Life Share Market Update
येत्या काळात या 2 मेटल शेअर्समध्ये दिसेल मजबूत तेजी, आताच खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

पॉवर ग्रीड (POWERGRID )

एचसीएल टेक (HCLTECH)

इन्फोसिस (INFY)

बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

डिविस लॅब (DIVISLAB)

टाटा पॉवर (TATAPOWER)

झी एन्टरटेनमेंट लिमिटेड (ZEEL)

पेज इंडिया (PAGEIND)

ट्रेंट (TRENT)

लॉरस लॅब (LAURUSLABS)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.