Share Market : आज 10 शेअर्स करतील परफॉर्म ? जाणून घ्या

सेन्सेक्स 31 अंकांनी घसरून 58191 वर तर निफ्टी 17 अंकांनी घसरून 17315 वर बंद झाला.
Share Market
Share Marketesakal
Updated on

Share Market : शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी फ्लॅट बंद झाले. सेन्सेक्स 31 अंकांनी घसरून 58191 वर तर निफ्टी 17 अंकांनी घसरून 17315 वर बंद झाला. त्याचवेळी मिडकॅप, स्मॉलकॅप शेअर्समध्ये घसरण झाल्यानंतर रिकव्हरी दिसून आली. आयटी, एफएमसीजी, मेटल, फार्मा शेअर्समध्ये विक्री दिसली. बँकिंग आणि ऑटो शेअर्सवरही दबाव होता. निफ्टी बँक 105 अंकांनी घसरून 39.178 वर बंद झाला. त्याच वेळी, मिडकॅप 76 अंकांनी घसरला आणि 31407 वर बंद झाला.

Share Market
Share Market: शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह, सेन्सेक्स 750 अंकांनी गडगडला

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

निफ्टीने शुक्रवारी फ्लॅट बंद करण्यापूर्वी प्रचंड अस्थिरता पाहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. पण, निफ्टी 50 EMA वर बंद झाला. आता जोपर्यंत निफ्टी 17300 च्या वर राहील तोपर्यंत बाजार सकारात्मक ट्रेंडसह चालू राहण्याची अपेक्षा आहे. वरच्या बाजूने, निफ्टीसाठी 17600-17700 वर रझिस्टंस दिसून येतो. डाउनसाइड वर 17200 वर सपोर्ट दिसत आहे.

Share Market
Share Market: आयपीओनंतर 4 महिन्यांत 90% वाढला 'हा' शेअर

निफ्टी शुक्रवारी दिवसभर अस्थिर होता, पण डेली चार्टवर तो 50 EMA च्या वर राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. मोमेंटम इंडिकेटर आरएसआय तेजीच्या क्रॉसओव्हरमध्ये प्रवेश करत असल्याचेही त्यांनी जोडले. शॉर्ट टर्ममध्ये बँक निफ्टी 40000 च्या दिशेने जाताना पाहू शकतो. खाली 38500 वर सपोर्ट आहे.

Share Market
Share Market: फक्त 7 रुपयांवर लिस्ट झालेल्या 'या' कंपनीत एकाच वर्षात 93 पट वाढ

जागतिक बाजारात, विशेषत: अमेरिकन बाजारांमध्ये अजूनही टिकाऊ रिकव्हरी होण्याची चिन्हे नसल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. अशा स्थितीत पुढे जाताना बाजारात अस्थिरता दिसून येईल. बाजारातील गुंतवणूकदार आणि व्यापार्‍यांनी हे लक्षात घेऊनच आपली भूमिका ठरवावी असेही अजित मिश्रा म्हणाले.

Share Market
Share Market : प्राज इंडस्ट्रीजचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर, आणखी तेजी येईल का ?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

  • टाटा कंझ्युमर (TATACONSUMER)

  • बीपीसीएल (BPCL)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEM)

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

  • जुबिलंट फूडवर्क्स (JUBLFOOD)

  • डीक्सन (DIXON)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTBANK)

  • ए यू बँक (AUBANK)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

Share Market
Share Market: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात पडझड, Tata चे शेअर्स घसरले

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.