Share Market : 'या' सरकारी फर्टिलायझर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजीचे संकेत; तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर?

शेअर्समध्ये येत्या काळात दमदार तेजी दिसू शकते असा विश्वास शेअर मार्केट तज्ज्ञ व्यक्त करत आहे.
Share Market
Share MarketSakal
Updated on

Share Market : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये येत्या काळात दमदार तेजी दिसू शकते असा विश्वास शेअर मार्केट तज्ज्ञ व्यक्त करत आहे.

आरसीएफएल युरिया, कॉम्प्लेक्स फर्टिलायझर्स, बायो-फर्टिलायझर्स, 100% पाण्यात विरघळणारी खते आणि औद्योगिक रसायनांच्या विस्तृत श्रेणीचे उत्पादन करते. सुमारे 7,600 कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह, ही कंपनी या क्षेत्रातील दिग्गज मानली जाते.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सच्या (RCF) स्टॉकने शुक्रवारी दमदार कामगिरी केली. जोरदार खरेदीमुळे स्टॉक 6% पेक्षा जास्त वाढला आहे. तांत्रिकदृष्ट्या, याने व्ही-शेप रिकव्हरी केली आहे. हे खालच्या स्तरावर मजबूत सपोर्टचे संकेत देत आहे.

शेअर सध्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाजवळ व्यवहार करत आहे. त्याची सर्व प्रमुख मूव्हिंग एव्हरेज अपट्रेंडमध्ये आहे आणि सर्व वेळ फ्रेमवर तेजी दर्शवित आहे. 14 दिवसांचा आरएसआय (61.45) तेजीच्या झोनमध्ये दाखल झाला आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

एमएसीडीने तेजीच्या क्रॉसओव्हरचे संकेत दिले आहेत. हा स्टॉक तांत्रिकदृष्ट्या खूप मजबूत आहे आणि येत्या काही दिवसांत आणखी वाढ अपेक्षित असल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञ सांगत आहेत.

Share Market
Ratan Tata : ज्यांनी खिल्ली उडवली, त्यांनाच लावलं कामाला; टाटांचा पॅटर्नच वेगळा

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.