Share Market : दक्षिण भारतातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री करणारी सर्वात मोठी रिटेल चेन इलेक्ट्रॉनिक्स मार्टचा (Electronics Mart) आयपीओ येणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्टचा आयपीओ पुढील महिन्यात 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. 3 ऑक्टोबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी हा इश्यू खुला होईल. या इश्यूअंतर्गत कंपनी 500 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करेल. 12 ऑक्टोबर रोजी शेअर्सचे फायनल वाटप होईल आणि 17 ऑक्टोबरला लिस्टिंग होईल. कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबर 2021 मध्ये बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केले होते.
आयपीओतून उभारण्यात येणारे 111.44 कोटी रुपये कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी, 220 कोटी रुपये वर्किंग कॅपिटलची वाढीव गरज भागवण्यासाठी आणि 55 कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी वापरले जातील. इश्यूचे प्रमुख व्यवस्थापक आनंद राठी एडवायझर्स, आयआयएफएल सिक्युरिटीज आणि जेएम फायनान्शियल आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाची सुरुवात पवन कुमार बजाज आणि करण बजाज यांनी केली होती. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि एनसीआर मधील 36 शहरे/नगरांमध्ये त्याची 112 दुकाने आहेत. गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये, ऑपरेशन्समधून 4349.32 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता, हाच आकडा एक वर्षापूर्वी 3201.88 कोटी रुपये होता.
दुसरीकडे, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये, वार्षिक आधारावर नेट प्रॉफिट 103.89 कोटी रुपयांवरून 40.65 कोटी रुपयांवर घसरले. ऑगस्ट 2022 पर्यंत कंपनीच्या वर्किंग कॅपिटल फॅसिलिटीज 919.58 कोटी रुपये होती तर जून 2022 पर्यंत निव्वळ कर्ज 446.54 कोटी रुपये होते.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.