Share Market : या दोन स्टॉकमध्ये मिळेल बंपर रिटर्न, तुमच्याकडे आहेत का ?

एफएमसीजी आणि ऑटो शेअर बाजाराच्या रिकव्हरीमध्ये सर्वाधिक खरेदी केल जात आहेत.
Share Market : या दोन स्टॉकमध्ये मिळेल बंपर रिटर्न, तुमच्याकडे आहेत का ?
Updated on

Share Market : गेल्या काही दिवसांत एफएमसीजी आणि ऑटो शेअर बाजाराच्या रिकव्हरीमध्ये सर्वाधिक खरेदी केल जात आहेत. निफ्टीमध्ये HUL सुमारे 3 टक्क्यांच्या वाढीसह अव्वल स्थानी आहे. याशिवाय मारुती आणि आयशर मोटरचे भावही 2-2 टक्क्यांनी वधारले आहेत. अशा अस्थिर बाजारात मार्केट एक्सपर्ट फिनमार्टचे विकास सेठी सेठींनी तुमच्यासाठी कॅश मार्केटमधील दोन शेअर्स निवडले आहेत.

Share Market : या दोन स्टॉकमध्ये मिळेल बंपर रिटर्न, तुमच्याकडे आहेत का ?
Share Market: शेअर बाजारात तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 337 तर निफ्टी 89 अंकांनी घसरला

सतलज टेक्सटाईल्स (Sutlej Textiles)

मार्केट एक्सपर्ट विकास सेठी यांनी पहिला स्टॉक निवडला आहे कॅश मार्केटमधील सतलज टेक्सटाईल्सचा (Sutlej Textiles). या स्टॉकचे शॉर्ट टर्म टारगेट 85 रुपये आणि स्टॉप लॉस 69 रुपयांवर ठेवायला त्यांनी सांगितले आहे. या कंपनीचे प्रमोशन डॉ केके बिर्ला यांनी केले आहे. ही कंपनी टेक्सटाईल, कॉटन यार्न आणि होम टेक्सटाईल सेगमेंटच्या व्यवसायात गुंतलेले आहे.

Share Market : या दोन स्टॉकमध्ये मिळेल बंपर रिटर्न, तुमच्याकडे आहेत का ?
Share Market : हे 3 शेअर्स तुमचा पोर्टफोलिओ बनवतील दमदार

रेमंड, सियाराम, एरो, आदित्य बिर्ला फॅशन, डोनर तसेच अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड कंपनीचे मोठे ग्राहक आहेत. कंपनीकडे मजबूत ऑर्डर बुक आहे. तसेच व्हॅल्युएशनच्या दृष्टीने हा शेअर खूप स्वस्त आहे. शेअरचे मार्केट कॅप 1180 कोटी रुपये आहे. कंपनीने जून तिमाहीत 45 कोटी रुपयांच्या PAT सह चांगले निकाल जाहीर केले. एकूणच, स्टॉकमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

Share Market : या दोन स्टॉकमध्ये मिळेल बंपर रिटर्न, तुमच्याकडे आहेत का ?
Share Market: शेअर बाजारात विक्रीचा जोर कायम, सेन्सेक्स निफ्टी घसरला

सतलज टेक्सटाईल्स (Sutlej Textiles)

  • सीएमपी (CMP) - 75 रुपये

  • टारगेट (TARGET) - 85 रुपये

  • स्टॉप लॉस (STOPLOSS) - 69 रुपये

Share Market : या दोन स्टॉकमध्ये मिळेल बंपर रिटर्न, तुमच्याकडे आहेत का ?
Share Market : 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर तज्ज्ञांचा फेव्हरेट

लेटेंट व्ह्यू ऍनालिटिक्स (Latent View Analytics)

मार्केट एक्सपर्ट विकास सेठी यांनी कॅश मार्केटमधूनच दुसरा शेअर दिला, तो म्हणजे लेटेंट व्ह्यू ऍनालिटिक्स (Latent View Analytics). ही कंपनी डेटा इंजीनिअरिंग, डेटा कंसल्टंट आणि डेटा ऍनालिसिस व्यवसायात आहे. भारतात लेटेंट व्ह्यूसारख्या मोजक्याच कंपन्या आहेत. कंपनीचा व्यवसाय रिटेल, बीएफएसआय आणि तंत्रज्ञान विभागांमध्ये आहे. कंपनीचे जगभरात 30 क्लायंट आहेत, जे फॉर्च्युन 500 कंपन्यांमध्ये समाविष्ट आहेत

Share Market : या दोन स्टॉकमध्ये मिळेल बंपर रिटर्न, तुमच्याकडे आहेत का ?
Share Market: शेअर बाजारात तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 262 अंकानी घसरला

मजबूत फंडामेंटल्स, PAT चा CAGR गेल्या 3 वर्षांत मजबूत आहे. कंपनीचा आयपीओ 300 पटीपेक्षा जास्त सबस्क्राईब झाला होता, भारतातील कोणत्याही पब्लिक इश्यूला मिळालेल्या प्रतिसादापेक्षा जास्त आहे. एकूणच, सेठींनी या स्टॉकवर खरेदीचे मत दिले आहे. स्टॉकचे शॉर्ट टारगेट 400 रुपये आहे. तर स्टॉप लॉस 375 रुपयांवर ठेवायला सांगितला आहे.

लेटेंट व्ह्यू ऍनालिटिक्स (Latent View Analytics)

  • सीएमपी (CMP) - 387 रुपये

  • टारगेट (TARGET) - 400 रुपये

  • स्टॉप लॉस (STOPLOSS) - 375 रुपये

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.