Share Market : शेअर बाजारात कायम अस्थिर वातावरण दिसून येते. अशात चांगल्या फंडामेटल्स असणाऱ्या शेअर्समध्ये खरेदी तुम्हाला अशा अस्थिर वातावरणात तग धरण्याचे धैर्य देते. त्यामुळेच शेअर बाजार तज्ज्ञांची मदत फायदेशीर ठरु शकते. शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी खरेदीसाठी मजबूत स्टॉक निवडला आहे आणि इथे पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे.
मार्केट तज्ज्ञ संदीप जैन यांनी मेनन पिस्टनची (Menon Pistons) निवड केली आहे. ही कंपनी 1971 पासून कार्यरत आहे. या स्टॉकची सपोर्ट लेव्हल 45-50 च्या दरम्यान आहे आणि हा स्टॉक त्याच्या सपोर्ट लेव्हल जवळ आहे.
मेनन पिस्टन (Menon Pistons)
सीएमपी (CMP) - 59.20 रुपये
टारगेट (Target) - 65/70 रुपये
कंपनी काय करते?
मेनन पिस्टन (Menon Pistons) ही कंपनी ऍल्युमिनियम एलॉय बनवते. याशिवाय ही कंपनी ऑटो ऍन्सिलरी पार्ट्स बनवते. कंपनीचा कस्टमर बेस खूप चांगला आहे आणि फंडामेंटल्सही खूप मजबूत आहेत.
कंपनीचे फंडामेंटल्स?
कंपनी सध्या 15 च्या PE मल्टिपलवर ट्रेड करत आहे. याशिवाय, शेअरचा इक्विटीवर परतावा 20 टक्के आहे. दुसरीकडे, स्टॉकचे डिव्हिडेंड यील्ड 3 टक्के आहे आणि गेल्या 3 वर्षातील नफ्याचा CAGR 20-22 टक्के आहे. याशिवाय कंपनीतील प्रमोटर्सची हिस्सेदारी 74 टक्के आहे.
जून 2022 मध्ये, कंपनीने 5 कोटी रुपयांचा नफा कमावला आणि टीटीएम आधारावर 18 कोटी रुपयांचा नफा कमावला. कंपनीचे व्हॅल्यूएशन 300 कोटी रुपये आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.