Share Market Tips : विकली एक्सपायरीला बाजारात रेंज ट्रेडिंग दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीवर बंद झाले. सेन्सेक्स 187 अंकांनी घसरून 60858 वर तर निफ्टी 58 अंकांनी घसरून 18108 वर बंद झाला.
मिडकॅप इंडेक्स सपाट बंद झाला. मिडकॅप 35 अंकांनी घसरून 31,345 वर बंद झाला. सर्वात मोठी घसरण एफएमसीजी, मेटल आणि ऑटो शेअर्समध्ये झाली.
फार्मा, एनर्जी शेअर्समध्ये विक्री दिसून आली. दुसरीकडे पीएसई, सरकारी बँक यांच्याशी संबंधित शेअर्स वधारत बंद झाले. निफ्टी बँक 129 अंकांनी घसरून 42329 वर बंद झाला.
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
निफ्टीने अलीकडे बेस ट्रँगल पॅटर्न फॉर्मेशनमधून तेजीचा ब्रेकआउट दिल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. 19 जानेवारीला एक छोटा कंसोलिडेशन दिसले, ज्यामुळे डेली चार्टवर इन्साईड बार पॅटर्न तयार झाला.
शॉर्ट टर्मच्या दृष्टीकोनातून, 18050-18000 पर्यंत आणखी कोणतीही घसरण ही नवीन खरेदीची संधी मानली पाहिजे. निफ्टी 18260-18300 चा अडथळा पार करू शकतो आणि पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये 18500 च्या दिशेने जाऊ शकतो.
हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय
कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारावर परिणाम झाल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. अमेरिका आणि युरोपमधील मंदीच्या चिंतेने गुंतवणूकदारांना इक्विटी मार्केटबाबत सावध केले आहे.
तांत्रिक दृष्टीकोनातून, चांगल्या पुल बॅक रॅलीनंतर, निफ्टीने इनसाइड बॉडी कँडल फॉर्मेशन तयार केले आहे. बाजाराची दिशा स्पष्ट नसल्याचं हे संकेत आहेत. व्यापाऱ्यांना 18050 च्या पातळीच्या जवळ सपोर्ट दिसत आहे.
जर निफ्टी याच्या खाली गेला तर ही घसरण 17950-17900 पर्यंत जाऊ शकते. दुसरीकडे, जर तो 18050 च्या वर टिकला तर त्यात 18200 ची पातळी दिसू शकते.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)
एशियन पेन्ट्स (ASIANPAINT)
टाटा मोटर्स (TATAMOTORS)
इंडसइंड बँक (INDUSINDBK)
अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
ट्रेंट (TRENT)
इंडियन हॉटेल (INDHOTEL)
व्होल्टास (VOLTAS)
ए यू बँक (AUBANK)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.