सध्या जगभरातील बाजारपेठांमध्ये अस्थिरता दिसून येते आहे आणि त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही होत आहे. वाढती महागाई पाहता अमेरिकेतील व्याजदर वाढल्याचा परिणाम बाजारावर झाल्याचे दिसून आले. बाजारातील अलीकडच्या घसरणीत अनेकजणांसाठी ही गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे. त्यामुळे चांगल्या शेअर्सच्या शोधात गुंतवणुकदार आहेत. अशातच टेक्सटाईल क्षेत्रातील ट्रायडंट (Trident) हा शेअर लक्ष वेधून घेत आहे. हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने ट्रायडंटचा त्यांच्या टॉप रिसर्च आयडियामध्ये समावेश केला आहे. 1 वर्षासाठी यात पैसे गुंतवले जाऊ शकतात असा सल्ला त्यांनी दिला आहे.
ट्रायडंट (Trident) - टारगेट 66 रुपये
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने ट्रायडंटवर (Trident) खरेदीचे (BUY on Trident) रेटिंग दिले आहे. ज्यासाठी टारगेट 66 रुपये ठेवण्यात आले आहे. तसंच कालावधी एक वर्षांहून अधिक काळ ठेवण्यात आला आहे. 18 एप्रिल 2022 लाट्रायडंटच्या शेअरची किंमत 55 रुपये होती. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना प्रति शेअर 55 रुपये किंवा सध्याच्या किमतीच्या सुमारे 20 टक्के परतावा मिळू शकतो. स्टॉकचा PE मल्टीपल 39 आहे. या अर्थाने, तो एक महाग स्टॉक आहे. पण, सध्या हा शेअर त्याच्या 52-आठवड्यांच्या नीचांकीपासून (13.1 रुपये) जवळजवळ 318 टक्क्यांनी वाढला आहे.
एका वर्षात 302% परतावा
ट्रायडंट ही टेक्सटाईल क्षेत्रातील कंपनी असून 1990 साली तिची स्थापन झाली. ट्रायडंटच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना गेल्या वर्षभरात 302 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. म्हणजेच वर्षभरापूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख गुंतवणाऱ्यांची संपत्ती 4 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. या कालावधीत शेअरची किंमत 13.45 रुपयांवरुन (19 एप्रिल 2021) 55 रुपयांपर्यंत (18 एप्रिल 2022) वाढली आहे. त्याच वेळी, जर आपण 5 वर्षांच्या परताव्यावर नजर टाकली तर, गुंतवणूकदारांनी स्टॉकमध्ये 540 टक्क्यांहून अधिक नफा कमावला आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.