बुधवारी शेअर बाजारांमध्ये रिकव्हरी आणि बऱ्याच खरेदीमुळे सेन्सेक्स-निफ्टी सुमारे 2 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. बाजारात गॅप-अप ओपनिंग राहिले. सेन्सेक्स 1,039.80 अंकांच्या अर्थात 1.86 टक्क्यांच्या वाढीसह 56,816.65 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 312.30 अंकांच्या अर्थात 1.87 टक्क्यांच्या वाढीसह 16,975.30 वर बंद झाला.
कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्यानेही बाजारातील उत्साह वाढल्याचे अॅक्सिस सिक्युरिटीजचे नीरज चदावार म्हणाले. याशिवाय रशिया आणि युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेतील बातम्यांनीही बाजारात सकारात्मकता वाढली.
जागतिक बाजारपेठेवर महागाईचा दबाव वाढत असल्याने बाजाराची नजर आता यूएस फेडच्या बैठकीच्या निर्णयाकडे आहे. अशा स्थितीत सेंट्रल बँकेची भूमिका काय आहे, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. यूएस फेडचे प्राधान्य महागाई नियंत्रित करण्यावर असल्याचेही ते म्हणाले.
निफ्टीने मजबूत रिकव्हरी पाहिल्याचे कोटक सिक्युरिटीजचे सहज अग्रवाल यांचे म्हणणे आहे. आता निफ्टीला 17,200-17,300 च्या पातळीवर रझिस्तास दिसून येत आहे. डाउनसाइडवर, 16,500-16,600 वर सपोर्ट आहे.
आजच्या टॉप 10 शेअर्सवर नजर टाकुया
अल्ट्राटेक सीमेंट (ULTRACEMCO)
ॲक्सिस बँक (AXISBANK)
बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)
इंडसइंड बँक (INDUSINDBK)
श्री सिमेंट (SHREECEM)
फेडरल बँक (FEDERALBNK)
व्होल्टास (VOLTAS)
अशोक लेलँड (ASHOKLEY)
एलआयसी हाउसिंग फायनान्स (LICHSGFIN)
भारतीय कंटेनर निगम लिमिटेड (CONCOR)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.