Share Market Update: शेअर बाजारावर गुरूवारी होळीचा उत्साह पाहायला मिळाला. बाजार बंद होण्याआधी त्याने उसळी घेतली होती. सलग दुसऱ्या दिवशी बीएसई सेंसेक्स (BSE Sensex) १००० हून अधिक अंकांनी उसळी घेऊन बंद झाला. तर, निफ्टी (NSE) ३०० हून अधिक अंकांनी बंद झाला. (Share Market sensex and nifty rises)
व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स १०४७.२८ अंकांच्या म्हणजे १.८४ टक्क्यांनी वाढून ५७,८६३,९३ अंकांवर वर बंद झाला. तर निफ्टी ३११ अंकांनी वाढून १७,२८७,०५ वर बंद झाला. व्यवहारादरम्यान, सेन्सेक्स ५८,०९५,८४ अंकांच्या उच्चांकावर पोहोचला. तर निफ्टी १७,३४४ अंकांवर होता.
गुरूवारी सकाळी शेअर बाजाराला सुरूवात तेजीने झाली. सकाळी सेन्सेक्स ८.३.६३ अंकांनी वधारून ५७,६२०.२८ वर सुरु झाला, तर निफ्टीही २२७.६ अंकांनी वधारून १७,२०२.९० वर सुरु झाला होता. कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्याने बाजारात उत्साह वाढला आहे. याशिवाय रशिया आणि युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेतील बातम्यांनीही बाजारात सकारात्मकता वाढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.