हिंदुस्थान मोटर्सचे शेअर्स तब्बल 12 वर्षांनंतर कात टाकताना दिसत आहेत. हा स्टॉक गेल्या 15 दिवसांपासून अप्पर सर्किटमध्ये आहे आणि मंगळवारी हा शेअर बीएसईवर सुमारे 5 टक्क्यांच्या मजबूतीसह 25.55 रुपयांवर व्यवहार करताना दिसला जी गेल्या जवळपास 12 वर्षांतील स्टॉकची सर्वोच्च पातळी आहे. या स्टॉकने 18 दिवसांत सुमारे 146 टक्के परतावा दिला आहे.
(Share Market Update)
हिंदुस्थान मोटर्सचा स्टॉक 22 सप्टेंबर 2021 रोजी 7 रुपयांवर होता. तर आज हा शेअर 25.55 रुपयांवर आहे, म्हणजेच या स्टॉकने 2021 पासून तब्बल 265 टक्के परतावा दिला आहे. सध्या हिंदुस्थान मोटर्सचे मार्केट कॅप 532 कोटी रुपये आहे.
वाहने बनवणारी कंपनी
कंपनी उत्तरपारा आणि पिथमपूर विभागात अॅम्बेसेडर (1500 आणि 2000 cc डिझेल, 1800 cc पेट्रोल, CNG आणि LPG व्हर्जन) तयार करते. याव्यतिरिक्त, कंपनी 1 टन पेलोडसह लाइट कमर्शियल व्हेहिकल मिनी ट्रक विनरही (2000 सीसी डिझेल आणि सीएनजी) तयार करते.
हिंदुस्थान मोटर्सचा शेअर 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे. तसेच, या स्टॉकने 18 दिवसांत 146.15 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
एका महिन्यात 132% परतावा
हिंदुस्थान मोटर्सचा शेअर मंगळवारी 5 टक्क्यांच्या वाढीसह 25.55 रुपयांच्या पातळीवर आहे. गेल्या पाच दिवसांत स्टॉक 21.43 टक्क्यांनी वधारला आहे म्हणजेच हा शेअर एका महिन्यात सुमारे 132.88 टक्क्यांनी वाढला आहे.
हिंदुस्थान मोटर्सचा स्टॉक सध्या 28.53 च्या PE वर व्यापार करत आहे, जे उच्च मूल्यांकन (High Valuation) आहे. हा स्टॉक लाँग टर्मसाठी चांगला नसल्याचे तज्ज्ञांच्या मत आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.