Share Market: सेन्सेक्स अन् निफ्टी म्हणजे नेमके काय?

शेअर बाजार गडगडला, आज विक्रमी उच्चांक गाठला आहे.
What is Sensex an Nifty
What is Sensex an Niftyesakal
Updated on
Summary

हे दोन्ही निर्देशांक शेअर बाजारातील अस्थिरता मोजण्याचे काम करतात. सहसा जेव्हा कोणी निफ्टी म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ निफ्टी 50 असा होतो.

शेअर बाजार (Share Market) गडगडला, आज विक्रमी उच्चांक गाठला आहे. सेन्सेक्स (Sensex), निफ्टी (Nifty), निर्देशांक असे एक ना अनेक शब्द दररोज आपल्या कानावर पडतात, पण त्यांचा अर्थ नेमका काय ते कळत नाही. तुमच्याही मनात याबाबत उत्सुकता असेल नाही का, त्यामुळे आज आपण सेन्सेक्स आणि निफ्टी काय आहेत, त्याची मोजदाद कशी केली जाते ते जाणून घेणार आहोत.

- सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) हे दोन मुख्य लार्ज कॅप निर्देशांक (Large Cap Index)आहेत. सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजशी (BSE) संबंधित निर्देशांक आहे, तर निफ्टी नॅशनल स्टॉक एक्सचेंजशी (NSE) संबंधित निर्देशांक आहे. हे दोन्ही निर्देशांक शेअर बाजारातील अस्थिरता मोजण्याचे काम करतात. सहसा जेव्हा कोणी निफ्टी म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ निफ्टी 50 असा होतो.

What is Sensex an Nifty
गुंतवणूकदारांना दिलासा! शेअर बाजारात 300 अंकांची उसळी

1. सेन्सेक्स म्हणजे काय? (What is Sensex)

सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE)चा बेंचमार्क निर्देशांक आहे. म्हणूनच त्याला बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex)असेही म्हणतात. सेन्सेक्स हा शब्द सेन्सिटिव्ह आणि इंडेक्स यांच्या संयोगातून बनला आहे. सगळ्यात आधी याला 1986 मध्ये स्वीकारण्यात आले होते आणि हा 13 विविध क्षेत्रातील 30 कंपन्यांची अस्थिरता दाखवतो. या शेअर्समधील बदलांमुळे सेन्सेक्समध्ये चढ-उतार होतात. फ्री फ्लोट पद्धतीने सेन्सेक्सची गणना केली जाते.

2. सेन्सेक्सची गणना कशी केली जाते? (How is the Sensex calculated)

- सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या सर्व 30 कंपन्यांचे बाजार भांडवल (Market Capitalization) मोजले जाते. यासाठी कंपनीने जारी केलेल्या शेअर्सची संख्या शेअरच्या दराने गुणली जाते. यातून मिळालेल्या आकड्याला कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalization) म्हणतात.

What is Sensex an Nifty
ओमायक्रॉनची भीती झुगारून सेन्सेक्स 619 अंश वाढला

- आता त्या कंपनीचा फ्री फ्लोट फॅक्टर (Free float factor)काढला जातो. म्हणजे कंपनीने जारी केलेल्या एकूण शेअर्सची टक्केवारी, जी बाजारात ट्रेडिंगसाठी उपलब्ध आहे तो म्हणजे फ्री फ्लोट फॅक्टर होय. उदा. अबकड नावाच्या कंपनीच्या 100 शेअर्सपैकी 40 शेअर्स सरकार आणि प्रमोटर्सकडे आहेत, त्यानंतर फक्त 60 टक्के शेअर्स ट्रेडिंगसाठी उपलब्ध असतील. म्हणजेच या कंपनीचा फ्री फ्लोट फॅक्टर 60 टक्के झाला.

- सर्व कंपन्यांच्या फ्री फ्लोट फॅक्टरला त्या कंपनीच्या बाजार भांडवलाने (Market Capitalization) गुणून (Multiplication) कंपनीच्या फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशनची गणना केली जाते.

- सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या सर्व 30 कंपन्यांचे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन जोडल्यावर, त्याला बेस व्हॅल्यूने भागायचे (Division) आणि नंतर बेस इंडेक्स व्हॅल्यूने गुणायचे (Multiplication). सेन्सेक्ससाठी बेस व्हॅल्यू 2501.24 कोटी रुपये निश्चित केली आहे. याशिवाय, मूळ निर्देशांक मूल्य (Base Index Value) 100 आहे. या गणनेतून सेन्सेक्स काढला जातो.

What is Sensex an Nifty
Share Market: हजार अंशांनी घसरला सेन्सेक्स; सात महिन्यांतील मोठी घसरण

3. आता निफ्टी 50 म्हणजे काय पाहुयात ? (What is Nifty)

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 50 हा देखील एक प्रमुख मार्केट इंडिकेटर आहे. निफ्टी हा शब्द नॅशनल आणि फिफ्टी यांच्या संयोगातून तयार झाला आहे. नावानुसार, या निर्देशांकात 14 क्षेत्रातील 50 भारतीय कंपन्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे ते बीएसईपेक्षा (BSE) अधिक वैविध्यपूर्ण (Diversified) आहे. हा निर्देशांक लार्ज कॅप कंपन्यांच्या बाजारातील कामगिरीचा मागोवा (Track) घेते. 1996 मध्ये लाँच केले गेले आणि याला फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारे मोजले जाते.

4. निफ्टीची गणना कशी केली जाते? (How is the Nifty calculated)

- निफ्टीची गणनाही सेन्सेक्ससारखीच फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारे केली जाते, पण थोडाफार फरक आहे.

- निफ्टीच्या गणनेसाठी, सगळ्यात आधी सर्व कंपन्यांचे बाजार भांडवल मोजले जाते, त्यातील आउटस्टँडिंग शेअर्सची संख्या वर्तमान किंमतीने (Current Price) गुणाकार (Multiply) केली जाते.

- यानंतर मार्केट कॅपला इनव्हेस्टेबल वेट फॅक्टरने (RWF) गुणले जाते. RWF सार्वजनिक व्यापारासाठी (Public Trading) उपलब्ध शेअर्सचा भाग आहे.

- त्यानंतर मार्केट कॅपला एकेका स्टॉकला नियुक्त केलेल्या वेटेजने (Weightage) गुणले (Multiply) जाते.

- निफ्टीची गणना करण्यासाठी, सर्व कंपन्यांचे सध्याचे बाजार मूल्य (Current Market Value) मूळ बाजार भांडवलाने (Base Market Capital) भागून, मग बेस व्हॅल्यूने गुणले जाते. मूळ बाजार भांडवल 2.06 लाख कोटी रुपये निश्चित केले आहे आणि मूळ मूल्य निर्देशांक (Base Value Index) 1000 आहे.

What is Sensex an Nifty
‘सेन्सेक्स’ने विक्रमी पातळी गाठली; पुढे काय?

5. निफ्टी, सेन्सेक्सची आणखी खासियत काय ?

भारतीय शेअर बाजारातील चढ-उतार दर्शविणारे हे दोनच निर्देशांक नाहीत. याशिवाय, अनेक निर्देशांक आहेत, ज्यांचा वापर स्टॉकची हालचाल समजून घेण्यासाठी केला जातो. यापैकी बहुतेक निर्देशांक एका विशिष्ट क्षेत्राशी जोडलेले आहेत. उदा. एका दिवसात 12 प्रमुख बँकांच्या शेअर्सची सरासरी हालचाल दर्शवणारा बँक इंडेक्स, सरकारी बँकांच्या शेअर्सची स्थिती दाखवणारा PSU बँक इंडेक्स, जो फक्त स्टील, अॅल्युमिनियममधील किंवा खाण क्षेत्रातील शेअर्स बाबतीतला मेटल इंडेक्स किंवा फार्मा कंपन्यांच्या शेअर्सचा फार्मा इंडेक्स असे निर्देशांकाचे प्रकार आहेत.

हे सर्व निर्देशांक बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी किंवा त्यांना सल्ला देणाऱ्या दलाल किंवा सल्लागारांसाठी अतिशय उपयुक्त आहेत. पण जर तुम्हाला बाजाराचा एकूण कल पटकन समजून घ्यायचा असेल किंवा भविष्यातील संकेत जाणून घ्यायचे असतील, तर त्यासाठी फक्त सेन्सेक्स आणि निफ्टी सारख्या बेंचमार्क निर्देशांकांचा विचार केला जातो.

जर हे निर्देशांक नसतील, तर व्यवहाराच्या दिवसाच्या कोणत्याही वेळी एक नजर टाकून, शेअर बाजाराच्या कलाचा अंदाज लावणे कठीण होईल. त्याचप्रमाणे, या दोन निर्देशांकांची मागील ऐतिहासिक आकडेवारी पाहता, गेल्या एक महिना, एक वर्ष, 5 वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीत भारतीय शेअर बाजाराची हालचाल म्हणजेच लिस्टेड कंपन्यांच्या व्यवसायाची स्थिती कशी आहे हे सहज समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.