नवा महिना, नवा दिवस कसा असेल शेअर बाजारासाठी?

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल ?
Share Market
Share MarketSakal
Updated on
Summary

शेअर बाजारात नरम-गरम स्थिती राहण्याचा शेअर बाजार तज्ज्ञांचा अंदाज

एफआयआयची विक्री आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या प्रॉफीट बुकींगमुळे शुक्रवारी सलग दुसऱ्या आठवड्यात बाजार घसरणीसह बंद झाला. 29 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 1514.69 अंकांनी अर्थात 2.49 टक्क्यांनी घसरून 59,306.93 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 443.2 अंकांच्या अर्थात 2.44 टक्क्यांच्या घसरणीसह 17,671.7 च्या पातळीवर बंद झाला. संपूर्ण ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर सेन्सेक्स आणि निफ्टी 0.30 टक्क्यांनी वाढले आहेत.

बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप गेल्या आठवड्यात सुमारे 1 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले आहेत. त्याचबरोबर संपूर्ण ऑक्टोबरबद्दल बोलायचे तर हा महिना ठिकठाक राहिला. ऑक्टोबरमध्ये 132 हून अधिक स्मॉलकॅप शेअर्समध्ये 10-75 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये टिळकनगर इंडस्ट्रीज, बेस्ट अॅग्रोलाइफ, महाराष्ट्र सीमलेस, ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नेटवर्क 18 मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट्स आणि टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) यांचा समावेश आहे.

Share Market
Share Market : 'या' शेअर्ससोबत साजरी करा तगड्या परताव्याची दिवाळी

त्याच वेळी, 100 हून अधिक स्टॉक्स असे आहेत ज्यात 10-56 टक्क्यांची घसरण झाली आहे. यामध्ये एसआरईआय इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स (SREI Infrastructure Finance), पॅनेसिया बायोटेक (Panacea Biotec), मॅक्लिओड रसेल (भारत) McLeod Russel (India), बालाजी एमिनीज (Balaji Amines), पीएनबी हाउसिंग फायनान्स, सोलारा ऍक्टीव्ह फार्मा अँड सायन्सेस (Solara Active Pharma Sciences) आणि गुजरात थेमीस बायोसिन (Themis Biosyn) यांचा समावेश आहे.

आज कशी असेल शेअर बाजारातली स्थिती ?

सध्या बाजार काही प्रमाणात ओव्हरसोल्ड दिसत असल्याचे एंजेल वनचे समीत चव्हाण सांगत आहेत. त्यामुळे बाजारात काहीसा चढ-उतार पाहायला मिळेल. पण व्यापाऱ्यांनी या रिबाउंडबद्दल जास्त उत्साही होण्याची गरज नाही. वरच्या बाजूस, निफ्टीसाठी 18,000-18,100 स्तरांवर लागलीच अडथळे दिसत आहेत असे चव्हाण म्हणाले. दुसरीकडे, निफ्टी 17,450 आणि नंतर 17,200-17,000 च्या दिशेने जाऊ शकतो असेही ते म्हणाले.

Share Market
'फोन पे' आणि 'पोस्ट पे' मध्ये खडाजंगी, का सुरु आहे वाद जाणून घेऊया

आजपासून सुरु होणारा आठवडा लहान असला तरी तो जोरदार हालचालींनी युक्त असू शकतो असे सॅमको सिक्युरिटीजच्या ईशा शाह म्हणाल्या. आगामी FOMC बैठकीवर शेअर बाजाराचे लक्ष असेल. याशिवाय आजपासून पुढील आठवड्यात वाहन विक्रीचे आकडेही येतील. सणासुदीचा हंगाम असूनही, सेमीकंडक्टरचा तुटवडा, वाढणारे मालवाहतुकीच्या किंमती आणि वस्तूंच्या वाढत्या किमती यांचा वाहन विक्रीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असेही शाह म्हणाल्या.

बाजारातील ओव्हरसोल्ड स्थितीमुळे शॉर्ट टर्म ट्रेंड कमजोर राहील असे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. निफ्टीसाठी 17,800 वर त्वरित अडथळा असल्याचे विकली ट्रेडिंग सेटअप संकेत देत आहे. जर निफ्टी त्याच्या वर राहिला तर तो 17,920-18,000-18,070 ची पातळीवर जाऊ शकतो. दुसरीकडे, जर तो 17,800 च्या खाली गेला, तर 17,600-17,500-17,420 ची पातळी खाली दिसू शकते असेही चौहान म्हणाले.

Share Market
Nazara Technologiesने विकत घेतली रस्क मीडियाची भागीदारी

आज कोणत्या शेअर्स नजर ठेवाल ?

- आयआरसीटीसी (IRCTC)

- एनआयआयटी टेक्नोलॉजीज (CONFORGE)

- महिंद्रा एंड महिंद्रा फाइनेंशियल सर्विसेज लिमिटेड (M&MFIN)

- श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लिमिटेड (SRTRANSFIN)

- आयडीया (IDEA)

- टेक महिन्द्रा (TECHM)

- एनटीपीसी (NTPC)

- इंडसइंड बँक (INDUSINSBANK)

- कोटक बँक (KOTAK BANK)

- रिलायन्स (RELIANCE)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()