26 नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात इक्विटी मार्केटमध्ये मोठी घसरण झाली. नवीन कोरोना व्हेरिएंटने बाजारात दहशत निर्माण केली असून शुक्रवारी निफ्टी 17000 च्या खाली घसरला. सेन्सेक्स 2,528.86 अंकांनी घसरून 57,107.15 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 738.3 अंकांनी घसरला आणि 17,026.5 वर बंद झाला. युरोपीय देशांमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे, वाढती महागाई आणि जगभरातील FII ची विक्री यामुळे बाजारावर विक्रीचा दबाव दिसून आला.
गेल्या आठवड्यात बीएसई ऑटो इंडेक्स 8 टक्के आणि रिॲलिटी इंडेक्स 6.8 टक्क्यांवर बंद झाला, तर टेलिकॉम आणि हेल्थकेअर निर्देशांक हिरव्या मार्कवर अर्थात तेजीसह बंद झाले आहेत. BSE मिडकॅप निर्देशांक 4 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.
स्मॉलकॅप निर्देशांक 2.5 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. पण या घसरणीतही, 41 स्मॉलकॅप निर्देशांक आहेत, ज्यात 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. यामध्ये ऑरम प्रॉपटेक (Aurum Proptech), जयप्रकाश असोसिएट्स (Jaiprakash Associates), आर सिस्टम्स इंटरनॅशनल (R Systems International) , टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) Tata Teleservices (Maharashtra), ट्रायडेंट (Trident), ब्राइटकॉम ग्रुप (Brightcom Group), जीआरएम ओव्हरसीज (GRM Overseas), एल्गी इक्विपमेंट्स (Elgi Equipments) आणि उर्जा ग्लोबल (Urja Global) या कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे.
निफ्टी 17200 आणि 17000 च्या सपोर्ट झोनच्या अगदी जवळ आल्याचे शेअरखानचे गौरव रतनपारखी म्हणाले. जोपर्यंत निफ्टी 17000 च्या वर राहील. तोपर्यंत या सपोर्ट झोनच्या वर रिकव्हरी अपेक्षित आहे. दुसरीकडे, जर निफ्टी क्लोजिंग बेसिसवर 17000 च्या खाली गेला तर 16700 च्या खाली जाताना दिसेल असेही ते म्हणाले.
दुसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर बाजार आता मॅक्रो आकडे आणि महागाईच्या आकडेवारीवर लक्ष ठेवेल असे सॅमको सिक्युरिटीजच्या (Samco Securities) येशा शाह म्हणाल्या. याशिवाय डिसेंबरमध्ये होणाऱ्या आरबीआय एमपीसीच्या बैठकीवरही बाजाराची नजर असेल. येत्या आठवड्यात काही आयपीओ लिस्टिंग चांगल्या झाल्या नाही तर बाजारातील तरलता अर्थात लिक्विडिटी कमी होण्याची चिन्हे स्पष्ट होतील असेही त्या म्हणाल्या. याशिवाय नोव्हेंबर महिन्यातील ऑटो विक्रीच्या आकडेवारीचाही या आठवड्यात बाजारावर परिणाम होणार आहे.
- जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
- टाटा मोटर्स (TATAMOTORS)
- हिंदाल्को (HINDALCO)
- अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)
- इंडसइंड बँक (INDUSINDBK)
- श्रीराम ट्रांसपोर्ट फायनान्स कंपनी लिमिटेड (SRTRANSFIN)
- आयडिया (IDEA)
- एमफॅसिस (MPHASIS)
- गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.