Share Market : 9 रुपयांचा शेअर पोहोचला तब्बल 3,700 रुपयांवर; गुंतवणुकदार कोट्यधीश

ज्यांनी गेल्या 2 दशकात आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे
share market
share marketsakal
Updated on

डिव्हिज लॅबोरेटरीज लिमिटेडची (Divi's Laboratories Limited) गणना अशा शेअर्समध्ये केली जाते. ज्यांनी गेल्या 2 दशकात आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. ही एक मल्टीनॅशनल भारतीय फार्मा कंपनी आहे, जिने गेल्या 19 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांची संपत्ती 408 पटीने वाढवली आहे.

डिव्हिज लॅबोरेटरीज लिमिटेडचे शेअर्स सोमवारी, 12 सप्टेंबरला नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 2.11 टक्क्यांनी वाढून 3,679.00 रुपयांवर बंद झाले. 13 मार्च 2003 रोजी, जेव्हा त्याचे शेअर्स एनएसईवर पहिल्यांदा लिस्ट झाले तेव्हा त्याची किंमत फक्त 9 रुपये होती. तेव्हापासून, गेल्या 19 वर्षांत, कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 40,777.78 टक्के परतावा दिला आहे.

share market
Share Market : येस बँकेच्या शेअर्सचा मागच्या 3 महिन्यांत 38 टक्के रिटर्न्स

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 13 मार्च 2003 रोजी डिव्हीस लॅबच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्या 1 लाख रुपयांची किंमत 4 कोटी 8 लाख रुपये झाले असते. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या कंपनीत 13 मार्च 2003 रोजी केवळ 25 हजार रुपये गुंतवले असते, तर त्याच पैशाची किंमत 1.02 कोटी झाली असती.

पण, गेल्या एका महिन्यात त्याचे शेअर्स 1.42 टक्क्यांनी घसरले आहेत. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात त्याचा स्टॉक सुमारे 27.65 टक्क्यांनी घसरला आहे. पण, गेल्या 5 वर्षांत, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 323 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी डिव्हीस लॅबच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे 4.23 लाख रुपये झाले असते.

share market
Share Market: पेटीएमच्या शेअर्समध्ये गेल्या दोन ट्रेडिंग सत्रात 16 टक्के वाढ

कंपनी काय करते ?

डिव्हिज लॅबोरेटरीज लिमिटेड (Divi's Laboratories Limited) ही 97.65 हजार कोटी रुपयांची मार्केट कॅप असलेली लार्जकॅप कंपनी आहे. मार्केट कॅपच्या बाबतीत ही देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनी ऍक्टिव फार्मास्युटिकल इंग्रिडिएंट्स आणि इंटरमीडिएट्स व्यवसायात आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

share market
Share Market : 'या' स्टॉकने एका वर्षात दिला 177 टक्के परतावा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.