Coal India शेअर्समध्ये 43 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

कंपनी मॅनेजमेंट येत्या काळात किमती वाढवण्याबाबत निर्णय घेऊ शकते.
Share Market
Share MarketSakal
Updated on
Summary

कंपनी मॅनेजमेंट येत्या काळात किमती वाढवण्याबाबत निर्णय घेऊ शकते.

Coal India : सरकारी मालकीची कोळसा खाण कंपनी कोल इंडियाची (Coal India) कामगिरी डिसेंबर तिमाहीत (Q3FY22) अतिशय चांगली राहिली आहे. शुक्रवारी हा स्टॉक सुमारे 2.5 टक्क्यांनी वाढला आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2021 या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 43 टक्के वाढ झाली आहे. कंपनीने प्रति शेअर 5 रुपये डिव्हिडेंडही जाहीर केला आहे. त्याच वेळी, सुमारे तीन वर्षांनंतर, कंपनीच्या ई-ऑक्‍शन प्रीमियम 100 टक्क्यांच्या पार गेला आहे. कंपनी मॅनेजमेंट येत्या काळात किमती वाढवण्याबाबत निर्णय घेऊ शकते.

Share Market
शेअर बाजार तज्ज्ञांनी तुमच्यासाठी निवडले दमदार शेअर्स

ब्रोकरेज हाऊस काय म्हणतंय ?

कोल इंडिया बँकेच्या डिसेंबर तिमाहीत चांगली रिकव्हरी झाल्याचे निकालांवर ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांचे म्हणणे आहे. मजबूत कोळशाच्या मागणीमुळे ई-ऑक्‍शन प्रीमियम जास्त आहे. 12 व्या तिमाहीत तो 100 टक्क्यांच्या पुढे गेला. त्याच वेळी, विक्रमी खरेदीमुळे कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात वाढ झाली आहे. ब्रोकरेजने हायर ई-ऑक्‍शन प्रीमियममुळे FY22E/FY23E साठी एडजस्‍टेड EBITDA 4 टक्के/15 टक्क्यांने वाढवला आहे. यासह, टारगेटही 200 रुपयांवरून 217 रुपये करण्यात आले आहे.

ICICI सिक्युरिटीजने कोल इंडियाचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. टारगेट 234 रुपये ठेवण्यात आले आहे. कंपनीचा आउटलूक चांगला आहे. कंपनी किंमत वाढवण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकते. ब्रोकरेज फर्म एडलवाईसने देखील हे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासह 200 रुपयांचे टारगेट दिले आहे. त्यांना विश्वास आहे की ई-ऑक्शन प्रीमियममध्ये मजबूत वाढ आणि व्हॉल्यूममध्ये वाढ यामुळे कंपनीच्या कामगिरीत सुधारणा होईल. याशिवाय वेतनवाढ आणि दरवाढ यावर विचार केला जाणार आहे.

Share Market
कॅश मार्केटचे 2 बेस्ट शेअर्स, तज्ज्ञ काय सांगतायत पाहूया...

कोल इंडियाचे शेअर्स 43 टक्के वाढण्याची अपेक्षा

कोल इंडियाच्या शेअरबाबतीत आयसीआयसीआय सिक्युरिटीजने सगळ्यात जास्त टारगेट सेट केले आहे. त्यांनी 234 रुपयांचे टारगेट दिले आहे. 17 फेब्रुवारीला शेअरची किंमत 163 रुपये होती. या किंमतीचा विचार केल्यास स्टॉक सुमारे 43 टक्क्यांनी वाढू शकतो. या PSU स्टॉकमध्ये गेल्या एका वर्षात 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी शेअरमध्ये 2.7 टक्क्यांहून अधिक तेजी पाहायला मिळाली.

तिसर्‍या तिमाहीचे निकाल

डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत कोल कंसॉलिडेटेड नेट प्रॉफिट अर्थात निव्वळ नफा जवळपास 47.7 टक्क्यांनी वाढून 4,558.39 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 3,085.39 कोटी रुपयांचा नफा झाला होता. समीक्षाधीन तिमाहीत कंपनीचा कंसॉलिडेटेड रेवेन्‍यू 23,686.03 कोटींवरून 28,433.50 कोटी इतका वाढला आहे. कंपनीचा कंसॉलिडेटेड एक्‍सपेंसही तिसऱ्या तिमाहीत वाढून 22,780.95 कोटी झाला आहे, जो एका वर्षापूर्वी डिसेंबर तिमाहीत 19,592.57 कोटी होता.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()