JSPLचे शेअर्स 10 वर्षांच्या उच्चांकावर! 6 दिवसात 16 टक्के वाढ

नुकताच सलग 6 दिवसांच्या खरेदीमुळे हा शेअर 16 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.
Share Market
Share MarketSakal
Updated on
Summary

नुकताच सलग 6 दिवसांच्या खरेदीमुळे हा शेअर 16 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेडचे (Jindal Steel & Power Ltd) शेअर्स 10 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचलेत. नुकताच सलग 6 दिवसांच्या खरेदीमुळे हा शेअर 16 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. या शेअरने (Shares) गुरुवारी बीएसईवर 529.40 रुपयांचा उच्चांक गाठला. याआधी ही पातळी 13 एप्रिल 2012 रोजी दिसली होती. हा शेअर NSE वर 10.85 रुपयांच्या अर्थात 2.12 टक्क्यांच्या वाढीसह 521.65 रुपयांवर बंद झाला. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेडचे (Jindal Steel & Power Ltd) संपूर्ण स्टील अपसायकलमध्ये डिलिव्हरेज करण्याच्या पॉलिसीवर ठाम आहे.

Share Market
Share Market: शेअर बाजाराच्या गटांगळ्या; सेन्सेक्स 495 तर निफ्टी 150 अंकांनी घसरला

दरम्यान, ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या शेअरवर खरेदीचे रेटिंग कायम ठेवत टारगेट 605 रुपये केले आहे. ऑस्ट्रेलिया आणि मोझांबिकमधील कॅप्टिव्ह कोळसा खाणींमुळे कंपनीला बचतीचा फायदा होईल, असे ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे. अलीकडे ऑस्ट्रेलियातील खाणींमधून उत्पादन सुरू झाले आहे

जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड (Jindal Steel & Power Ltd) 50 टक्के कोकेन कोळशाच्या कॅप्टिव्ह उत्पादनाचे प्रॉडक्शन साध्य करेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे कंपनीची मोठी बचत होणार आहे. JSPL ने त्यांच्या वोलॉन्गॉन्ग (Wollongong) खाणीतून शिपमेंट देखील सुरू केल्याचे मोतीलाल ओसवाल अहवालात म्हटले आहे. ज्यामुळे कंपनीची आर्थिक वर्ष 2023 मध्ये 20 कोटी डॉलरची बचत होऊ शकते.

Share Market
Share Market: शेअर बाजारातील तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 305 तर निफ्टी 70 अंकांनी घसरला

जेएसपीएलच्या कॅश फ्लोमध्ये मजबूत वाढ दिसून येईल असे हाऊस सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्च यांचे म्हणणे आहे. जेएसपीएल येत्या 2023 मध्ये कर्जमुक्त होईल अशी अपेक्षा आहे. सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चने या स्टॉकवरील बाय रेटिंग कायम ठेवत टारगेट 630 रुपयांवरून 659 रुपये केले आहे. एडलवाईस रिसर्चनेही या शेअरमध्ये खरेदीचा सल्ला देत 637 रुपयांचे टारगेट दिले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.