टाटा, जिंदाल, हिंडाल्कोच्या शेअर्समध्ये मोठी घसरण!

Share
Share File
Updated on
Summary

चीनमधून मागणी कमी झाल्याने मेटल कंपन्यांना याचा चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत आहे.

- शिल्पा गुजर

टाटा स्टील, जिंदल स्टील, हिंडाल्कोच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. निफ्टी मेटल इंडेक्स 6 टक्क्यांपेक्षाही जास्त कोसळला आहे. चीनमधून मागणी कमी झाल्याने मेटल कंपन्यांना याचा चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत आहे.

Share
ITC Share: 3 दिवसांत 11 टक्क्यांची वाढ! 52आठवड्यात उच्चांकावर शेअर्स

नफा बुकिंगमुळे (Profit Booking)सोमवारी धातू (Metal)कंपन्यांचे शेअर्स घसरले. निफ्टी मेटल इंडेक्स 6.6 टक्क्यांनी घसरला. गेल्या वर्षभरात मेटल इंडेक्स 130 टक्क्यांहून अधिक वाढला आहे आणि या वर्षी जवळपास 70 टक्क्यांनी वाढला आहे. टाटा स्टील, जिंदाल स्टील, हिंडाल्को इंडस्ट्रीज आणि सेल सारखे स्टॉक 3-10 टक्क्यांपर्यंत खाली आले.

Share
दिवसाला गुंतवा 233 रुपये आणि मिळवा 17 लाख, LICची नवी योजना

चीनकडून कमी मागणी हेच मेटल स्टॉकमधील घसरणीचे प्रमुख कारण आहे असे तज्ज्ञ सांगत आहेत. याशिवाय कमकुवत रिअल इस्टेट डेटामुळे या शेअर्सवर परिणाम झाल्याचे बाजारातील तज्ज्ञ सांगत आहेत. लोह खनिजांच्या किंमती कमी झाल्यामुळे स्टीलच्या स्टॉक्सवर परिणाम झाल्याचे आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे म्हणणे आहे. कोकिंग कोलच्या उच्च किंमती सध्या चीनच्या स्टील मार्जिनला दडपून टाकत आहेत आणि त्यामुळे स्टीलच्या किंमतींना सपोर्ट मिळत आहे. लोह खनिजांच्या कमी किंमतींमुळे स्क्रॅप कमी होईल आणि यामुळे लाँग स्टील उत्पादनांच्या किंमतीही कमी होतील असे ब्रोकरेज फर्मने सांगितले.

Share
मे महिन्यात डेट फंडात ६३,६६५ कोटींची गुंतवणूक, नोंदवली ४६ टक्क्यांची वाढ

अॅल्युमिनियमच्या किंमतीत रिकव्हरीची अपेक्षा आहे आणि त्यामुळे हिंदाल्को इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी करायचा सल्ला आयसीआयसीआय सिक्युरिटीजने दिला आहे. फेरस धातूंमध्ये जिंदाल स्टीलला सर्वोत्तम म्हटले आहे.

धातूच्या (Metal) स्टॉक्समध्ये घसरण केवळ काही काळासाठी असेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना महामारीनंतर अर्थव्यवस्था (Economy) उघडण्याचा आणि पायाभूत प्रकल्पांना (Infrastructure Projects) गती देण्याचा लाभ मेटल कंपन्यांना मिळेल असा विश्वासही तज्ज्ञांना वाटत आहे.

Share
हिंदुस्थान कॉपरचा ऑफर फॉर सेल आजपासून खुला

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()