अदानी ग्रुपच्या 'या' शेअरचा 20 वर्षात 22000% परतावा...

अलीकडच्या काळात अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स दबावाखाली आहेत पण लाँग टर्मचा विचार केल्यास या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे.
Adani Enterprises
Adani EnterprisesSAKAL
Updated on

अलीकडच्या काळात अदानी एंटरप्रायझेसचे (Adani Enterprises) शेअर्स दबावाखाली आहेत पण लाँग टर्मचा विचार केल्यास या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये सुमारे 221 पट वाढ झाली आहे आणि हा शेअर 9.41 रुपयांवरून 2082.10 रुपयांपर्यंत वाढला आहे. याचा अर्थ असा की गेल्या 20 वर्षांत या शेअरने सुमारे 22,000 टक्के परतावा दिला आहे.

Adani Enterprises
Dr Reddy च्या शेअर्समध्ये येत्या काळात 30% वाढ अपेक्षित...

गेल्या 1 वर्षात अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 1500 रुपयांवरून 2082 रुपयांपर्यंत वाढला आहे. या स्टॉकमध्ये 1 वर्षात 40 टक्के वाढ झाली आहे. पण गेल्या 5 वर्षांत हा शेअर 130 रुपयांवरून 2082 रुपयांपर्यंत खाली आला आहे. या शेअरने 5 वर्षांच्या काळात 1500 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 10 वर्षांत हा मल्टीबॅगर स्टॉक 222 रुपयांवरून 2082 रुपयांपर्यंत वाढला आहे. या दरम्यान त्यात 850 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 20 वर्षांत हा शेअर 9.41 रुपयांवरून 2082.10 रुपयांपर्यंत वाढला आहे. या दरम्यान या शेअरने 22,000 टक्के परतावा दिला आहे.

एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला आज 9.50 लाख रुपये मिळाले असते. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 20 वर्षांपूर्वी अदानी एंटरप्रायझेसमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 2.21 कोटी रुपये मिळाले असते.

Adani Enterprises
'हे' 3 शेअर्स येत्या काळात करतील कमाल आणि तुम्हाला मालामाल...

तुम्ही गुंतवणूक करावी का ?

गेल्या महिन्यात IIFL ने अदानी एंटरप्रायझेसवर (Adani Enterprises) विक्री कॉल (Sell Call) दिला होता आणि यासाठी 2000 रुपयांचे टारगेट दिले होते. सध्या या स्टॉकमध्ये बियरिश फ्लॅग ब्रेकडाउन देण्यात आल्याचे IIFL चे म्हणणे आहे. 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा कंसोलिडेटड विक्री 25141.56 कोटी होती, जी तिमाही आधारावर 32.58 टक्क्यांनी वाढली आहे. मागील तिमाहीत कंपनीची कंसोलिडेटड विक्री 18963.4 कोटी होती. अदानी एंटरप्रायझेसची स्थापना 1993 मध्ये झाली होती. ही एक लार्ज कॅप कंपनी आहे आणि तिचे मार्केट कॅप 236453.33 कोटी रुपये आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.