SIP: 5 वर्षांत 3 पट रिटर्न; इन्फ्रा फंड्समधून होईल बक्कळ कमाई

Top 3 Sectoral Infra Funds: म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) गुंतवणूकदारांना इक्विटी सेक्टरल इन्फ्रा फंडामध्ये (Infra Fund) गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय आहे.
Top 3 Sectoral Infra Funds
Top 3 Sectoral Infra FundsEsakal
Updated on

Mutual Fund SIP: अर्थसंकल्पानंतर (Budget) म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी (Investment) अनेक नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. येत्या काळात अधिक चांगल्या परताव्यासाठी, SIP गुंतवणूकदार इंफ्रास्‍ट्रक्‍चर, टेक्‍नोलॉजी, मॅन्‍युफॅक्‍चरिंग क्षेत्रातील फंड्समध्ये पैसै गुंतवू शकतात. अर्थसंकल्पाचा संपूर्ण फोकस इन्फ्रा क्षेत्रावर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. इन्फ्रावर जितका अधिक जोर दिला जाईल तितकी 'मेक इन इंडिया' (Make in India) संकल्पना अधिक मजबूत होईल आणि ती लाँग टर्ममध्ये चांगला परतावा देईल. म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) गुंतवणूकदारांना इक्विटी सेक्टरल इन्फ्रा फंडामध्ये (Infra Fund) गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय आहे. सेक्टरल फंडांच्या परताव्याबद्दल बोलायचे तर गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तिप्पट वाढ झाली आहे. (SIP: There will be huge earnings from infra funds)

Top 3 Sectoral Infra Funds
शेअर बाजारातील घसरणीची चिंता नको; 'या' 3 स्टॉक्सवर ठेवा विश्वास

तज्ज्ञ काय सांगतायत ? (What do the experts say?)-

बजेटमधून इन्फ्रा सेक्टरला चालना मिळणार असल्याचे BPN Fincap चे संचालक AK निगम म्हणाले. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी आता त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फंडाव्यतिरिक्त टेक्नॉलॉजी फंड आणि मॅन्युफॅक्चरिंग फंड यांचा समावेश करावा असेही ते म्हणाले. नवीन गुंतवणूकदारही या फंडांमध्ये गुंतवणूक सुरू करू शकतात.

बजेटमध्ये संपूर्ण लक्ष इन्फ्रास्ट्रक्चरवर केंद्रित आहे, इन्फ्रावर जितका जास्त जोर द्याल तितकी 'मेक इन इंडिया' संकल्पना चांगली होईल असे फिंटू या संपत्ती व्यवस्थापन कंपनीचे सीईओ मनीष पी. हिंगर म्हणाले. जेव्हा जेव्हा मेक इन इंडिया संकल्पना चांगली होईल तेव्हा ती लाँग टर्ममध्ये चांगला परतावा देईल. लाँग टर्म एसआयपीमध्ये चक्रवाढीचा प्रचंड फायदा होतो, असे त्यांनी सांगितले.

Top 3 Sectoral Infra Funds
शॉर्ट टर्ममध्ये पैसे कमवायचेत? मग 'या' शेअरचा विचार नक्की करा

टॉप 3 सेक्टरल इन्फ्रा फंड्स (Top 3 Sectoral Infra Funds)-

सेक्टोरल इन्फ्रास्ट्रक्चर फंडांची गेल्या 5 वर्षांतील कामगिरी पाहिली, तर गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. टॉप 3 परफॉर्मिंग इन्फ्रा फंडांच्या कामगिरीबद्दल माहिती जाणून घेऊयात.

क्‍वांट इंफ्रास्‍ट्रक्‍चर फंड (Quant Infrastructure Fund)-

5 वर्षांतील रिटर्न (वार्षिक): 26.46 टक्के

1 लाख रुपये गुंतवणुकीची सध्याची किंमत : 3.23 लाख रुपये

10,000 मंथली SIP ची सध्या व्हॅल्‍यू: 14.44 लाख रुपये

किमान गुंतवणूक : 5,000 रुपये

किमान SIP: 1000 रुपये

ऍसेट्स: 292 कोटी (31 डिसेंबर 2021 पर्यंत)

एक्‍सपेंश रेश्‍यो: 0.58% (31 डिसेंबर 2021 पर्यंत)

इन्‍वेस्‍को इंडिया इंफ्रास्‍ट्रक्‍चर फंड (Invesco India Infrastructure Fund)

5 वर्षांतील रिटर्न (वार्षिक): 19.21 फीसदी

1 लाख रुपये गुंतवणुकीची सध्याची किंमत : 2.41 लाख रुपये

10,000 मासिक SIP ची सध्या व्हॅल्‍यू: 10.94 लाख रुपये

किमान गुंतवणूक : 1,000 रुपये

किमान SIP: 500 रुपये

ऍसेट्स: 451 कोटी (31 जानेवरी 2022 पर्यंत)

एक्‍सपेंश रेश्‍यो: 1.05% (31 डिसेंबर 2021 पर्यंत)

BOI AXA मॅन्‍युफॅक्‍चरिंग अँड इंफ्रास्‍ट्रक्‍चर फंड (BOI AXA Manufacturing & Infrastructure Fund )-

5 वर्षांतील रिटर्न (वार्षिक): 18.80 फीसदी

1 लाख रुपये निवेश की वैल्‍यू: 2.37 लाख रुपये

10,000 मासिक SIP ची सध्या व्हॅल्‍यू: 10.91 लाख रुपये

किमान गुंतवणूक : 5,000 रुपये

किमान SIP: 1000 रुपये

ऍसेट्स: 71 कोटी (30 डिसेंबर 2021 पर्यंत)

एक्‍सपेंश रेश्‍यो: 1.52% (31 डिसेंबर 2021 पर्यंत)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.