आता तुम्ही डेबिट कार्डशिवायही एटीएममधून पैसे काढू शकता ! जाणून घ्या कसे ते

ATM
ATM
Updated on

सोलापूर : अलीकडच्या काळात नवनवीन तंत्रज्ञानामुळे आयुष्य सुकर होत आहे. तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की डेबिट कार्डशिवायही एटीएममधून पैसे काढता येतील ! होय, आता लवकरच तुम्ही डेबिट कार्डशिवाय एटीएममधून रोकड काढण्यास सक्षम असाल. हे शक्‍य आहे कारण, एनसीआर कॉर्पोरेशन या एटीएम कंपनीने यूपीआय प्लॅटफॉर्मवर आधारित देशातील पहिले इंटरऑपरेबल कार्डलेस कॅशलेस सोल्यूशन सुरू केले आहे. यानंतर आपण एटीएमवरील क्‍यूआर कोडमधून यूपीआयद्वारे पैसे काढू शकाल. जाणून घ्या याची संपूर्ण प्रकिया... 

एनसीआर कॉर्पोरेशन आणि सिटी युनियन बॅंक यांच्यात झाला करार 
सिटी युनियन बॅंक आणि एनसीआर कॉर्पोरेशन यांच्यात यूपीआयमार्फत रोख पैसे काढण्याच्या सुविधेसह एटीएम बसविण्यासंदर्भात करार करण्यात आला आहे. बॅंकेने आतापर्यंत या सुविधेसह 1500 हून अधिक एटीएम श्रेणी सुधारित केल्या आहेत. 

असे काढू शकता कार्डशिवाय एटीएममधून पैसे 

  • यूपीआयच्या माध्यमातून पैसे काढण्यासाठी प्रथम आपल्याला आपल्या फोनमध्ये कोणतेही यूपीआय ऍप उघडावे लागेल. 
  • त्यानंतर एटीएम स्क्रीनवरील क्‍यूआर कोड स्कॅन करावा लागेल. 
  • यानंतर आपल्या फोनमध्ये आपल्याला किती पैसे काढायचे आहेत ते एंटर करा. 
  • येथे लक्षात ठेवणारी गोष्ट म्हणजे एका वेळी फक्त 5000 रुपयेच काढता येतील. 
  • आता तुम्हाला प्रोसीड बटणावर क्‍लिक करावे लागेल. 
  • यानंतर, आपल्याला आपला 4 किंवा 6 अंकांचा यूपीआय पिन टाकावा लागेल. 
  • हे सर्व केल्यावर तुम्हाला एटीएममधून पैसे मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.