SPIC शेअर्स येत्या 3 महिन्यांत देणार 36 टक्के नफा!

आतापर्यंत साऊदर्न पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनच्या (SPIC)शेअर्सने 2021 मध्ये मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
Share Market
Share MarketSakal
Updated on
Summary

आतापर्यंत साऊदर्न पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनच्या (SPIC)शेअर्सने 2021 मध्ये मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

साऊदर्न पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज कॉर्प (SPIC) हा अशा शेअर्सपैकी एक आहे. ज्यांनी 2021 मध्ये मल्टीबॅगर (Multibagger) परतावा दिला आहे. 2021 च्या सुरुवातीला या शेअरची किंमत 24.40 रुपये प्रति शेअर होती, ती आता 51.60 रुपये प्रति शेअर झाली आहे. म्हणजेच 2021 मध्ये आतापर्यंत या शेअर्सने सुमारे 110 टक्के परतावा दिला आहे. येत्या तीन महिन्यांत हा स्टॉक (Stock) त्यांच्या गुंतवणूकदारांना आणखी 36 टक्के नफा देईल, असा विश्वास चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगडियांनी व्यक्त केला आहे.

Share Market
Share Market | हे शेअर्स देणार भरघोस रिटर्न! जाणून घ्या मार्केट मुड

सुमीत बगाडिया यांनी या स्टॉकसाठी बाय रेटिंग ( Buy Rating)देत पुढील तीन महिन्यांसाठी 68 रुपयांचे टारगेट (Target) दिले आहे. सोबतच 42 रुपयांवर स्टॉप लॉस (Stop Loss) ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. विकली चार्टवर या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये पेनंट पॅटर्नचे ब्रेकआउट दिले आहे. ज्याचा अर्थ तेजीचे संकेत असा आहे. हा स्टॉक त्याच्या 21 दिवस आणि 50 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीच्या वर ट्रेड करत आहे, जी एक सकारात्मक बाब असल्याचेही ते म्हणाले.

गेल्या 1 वर्षातील कामगिरी

साऊदर्न पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज कॉर्प (SPIC) शेअरने गेल्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 5.74 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत या स्टॉकच्या किमतीत सुमारे 15.82 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, 2021 मध्ये, या स्टॉकने 11.48 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे, तर गेल्या एका वर्षात त्याच्या गुंतवणूकदारांना 123.86 टक्के परतावा मिळाला आहे. शुक्रवारी, 11 डिसेंबरला SPIC शेअर्स NSE वर 0.09 टक्के वाढून, 51.60 रुपये प्रति शेअर वर बंद झाले.

Share Market
शेअर बाजारात पुन्हा तेजी! आज कोणते शेअर्स किती देणार परतावा

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.