Saving tips for children: सध्याच्या घडीला मुलांचे 'फ्यूचर प्लानिंग' त्यांच्या जन्मापासूनच सुरु करणे गरजेचे आहे. तुम्हाला कोणत्याही रिस्कशिवाय मुलांच्या नावे पैसे जमा करायचे आहेत का? जे त्याला 18 वर्षांचा झाल्यास उच्च शिक्षणासाठी उपयोगी पडतील तर तुमच्यासाठी पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) अकाउंट चांगला पर्याय आहे. तुम्ही तुमच्या मुलाच्या नावे (PPF) अकाउंट सुरु करु शकता, ज्याचा फायदा त्यांच्या उच्च शिक्षणासाठी होईल. पण जर तुम्ही तुमचा मुलगा किंवा मुलगी 18 वर्षांचे झाल्यास पीपीएफ अकाउंट सुरु करताय तर पुढे 15 वर्ष वाट बघायला लागेल. त्यामुळे जेवढा लवकर पीपीएफ अकाउंट सुरु कराल तेवढेच त्यांच्या भविष्याबाबत तुम्ही निश्चिंत राहाल.
पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत तुम्ही तुमच्या चिमुकल्याच्या नावे PPF अकाउंट ओपन करु शकता. पीपीएफ अकाउंटचा लॉक इन पीरियड 15 वर्षांचा असतो. जर तुम्ही मुलाचे वय 3 किंवा 4 असताना पीपीएफ अकाउंट सुरु केले तर तो किंवा ती 18 - 19 वर्षांचे झाल्यास हे अकाउंट मॅच्युअर होईल. तुमचा मुलगा किंवा मुलगी स्वतः हे अकाऊंट मॅनेज करु शकतील पुढे हे अकाउंट सुरु ठेवायचे असेल तर ते 5-5 वर्ष टेन्युअरमध्ये ठेवता येऊ शकेल.
PPF स्कीमच्या अंतर्गत फक्त 200 रुपये रोज बचत केल्यास दरमहिना 6,000 होतात. हे पैसे तुम्ही पीपीएफ अकाउंटमध्ये भरलवल्या वर्षाचे 72,000 होतात, असे 15 वर्ष पैसे भरायचे. त्याची एकूण रक्कम 10,80,000 रुपये इतकी होते. PPF मध्ये आता वार्षिक 7.1 टक्के कंपाउंडिंग व्याज मिळते. 15 वर्षांचे व्याज जोडल्यास एकूण रक्कम 19,52,740 लाख होते. म्हणजेच एकूण गुंतवणुकीवर तुम्हाला 8,72,740 रुपये व्याज मिळते.
एक आर्थिक वर्षांत कमीतकमी 500 रुपये गुंतवणूक गरजेची आहे. एका वर्षांत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. पीपीएफ स्कीममध्ये तुमची गुंतवणूक अतिशय सुरक्षित आहे, शिवाय तुम्हाला टॅक्स सूटीचा फायदाही मिळतो. पीपीएफ स्कीममध्ये गुंतवणुकीवर
डिडक्शनसोबतच मॅच्युरिटीची अमाउंट आणि व्याजावरही कोणताही टॅक्स लागत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.