डिजिटल व्यवसायातून तुम्ही घरबसल्या कोट्यवधींची कमाई करू शकता. यामध्ये तुमच्या खिशातून जास्त खर्च होणार नाही, पण दरमहा हजारोंचा नफा मात्र नक्की होईल. कसा तो जाणून घेऊयात.
How to Earn Money: तुम्ही नोकरीला कंटाळले आहात आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. आम्ही तुमच्यासाठी चांगली आणि कमी गुंतवणुकीच्या व्यवसायाची कल्पना घेऊन आलो आहोत. ही एक ऑनलाईन बिझनसेची कल्पना (Online Business) आहे. होय, आम्ही डिजिटल होर्डिंग व्यवसायाबद्दल बोलत आहोत, ज्याचा वापर कंपन्या त्यांच्या ब्रँडचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी करतात. पण यासाठी, तुम्हाला संगणकाचे अर्थात कम्प्युटरचे ज्ञान असणे खूप महत्वाचे आहे. ( Start Own Online Business by investing in Digital Hording)
डिजिटल होर्डिंग व्यवसाय (Digital Hoarding Business) -
डिजिटल होर्डिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला डिझायनिंग माहित असणे आवश्यक आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या ग्राहकांना आकर्षित करू शकता आणि चांगल्या डिझाइनसह पैसे कमवू शकता. विशेष म्हणजे हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या सुरू करू शकता. त्यासाठी पैसे कमी लागतात. यासाठी मोठ्या जागेची गरज नाही, कारण तु्म्ही हा बिझनेस एका खोलीत देखील सुरू करू शकता.
जर तुम्हाला ग्राफिक्स, डिझायनिंग आणि कॉम्प्युटरचे चांगले ज्ञान असेल तर तुम्ही घरी बसल्या डिजिटल होर्डिंग्ज तयार करण्याचे काम करू शकता. सुरुवातीच्या टप्प्यात, तुम्ही freelancing.com किंवा upwork इत्यादी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या विविध साइट्सवर तुमच्या कौशल्यावर आधारित ऑर्डर्स घेऊ शकता. जेव्हा तुम्हाला यात पुर्ण आत्मविश्वास येईल तेव्हा तुम्ही कोट्यवधीची कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला या पोर्टल्सवर स्वतःची नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यापूर्वी, त्यांची विश्वासार्हता जाणून घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या फेसबुक, इंस्टाग्राम किंवा ट्विटरवर डिजिटल होर्डिंग्ज बनवण्याबाबत माहिती देऊन लोकांकडून ऑनलाइन ऑर्डरही घेऊ शकता.
- एका रात्रीत व्हाल कोट्यधीश
वेबसाइट तयार झाल्यानंतर, तुम्ही स्वतःच तिचा प्रचार करू शकता जेणेकरून तुम्हाला अधिकाधिक ऑर्डर मिळतील. तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यात डिजिटल होर्डिंग्स बनवून व्यवहार करा, नंतर व्यवसायाच्या विस्तारासाठी ते छापूनही देऊ शकता. लहान बॅनरसाठी आपल्याला अधिक महाग प्रिंटरची आवश्यकता नाही. पण जर तुम्हाला हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर करायचा असेल तर खर्च थोडा वाढू शकतो कारण तुम्हाला मोठा प्रिंटर लागेल.
- किती खर्च येईल?
आताशा प्रत्येकच कंपनी त्यांच्या जाहिरातींसाठी डिजिटल होर्डिंग्ज बनवते. त्यामुळे तुम्ही तुमची स्वतःची वेबसाइट बनवू शकता. यासाठी, तुम्ही GoDaddy किंवा इतर कोणत्याही साइटवरून डोमेन (Domain) खरेदी करू शकता. या कामासाठी 1000 रुपयांपेक्षा कमी खर्च येईल. यानंतर, तुम्ही एका वर्षासाठी होस्टिंग घ्या. त्यासाठी सुमारे अडीच ते तीन हजार खर्च आहे. जर तुम्ही तुमची वेबसाइट डॉट कॉमद्वारे तयार केली तर त्यावर थोडा जास्त खर्च येतो. हा खर्च 50 हजार किंवा त्यापेक्षा कमी होतो. तर डॉट इनवर कमी खर्च येतो.
नोंद - कोणताही व्यवसाय सुरु करण्याआधी त्याची सखोल माहिती घेऊनच सुरु करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.