बिझनेसमन होण्यासाठी फायद्याची स्कीम; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुद्रा योजनेचा फायदा घेत सुरु करा स्वतःचा व्यवसाय!
Mudra Yojana
Mudra Yojanaesakal
Updated on
Summary

मुद्रा योजनेचा फायदा घेत सुरु करा स्वतःचा व्यवसाय!

तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय (Business)सुरू करायचा आहे? तसे असेल तर आम्ही तुमच्यासाठी व्यवसायाची कल्पना आणली आहे. हा एक असा व्यवसाय आहे ज्यातील उत्पादनांची मागणी सर्व स्तरातील लोकांना असते. अर्थातच आम्ही साबण बनवण्याच्या कारखान्याबद्दल म्हणजे साबण निर्मिती (Soap production) युनिटबद्दल बोलत आहोत.

साबण निर्मिती व्यवसाय काय आहे?

या व्यवसायात यंत्रांच्या साहाय्याने साबण (Soap) तयार करून बाजारात विकले जातात. बरेच लोक हस्तनिर्मित अर्थात हँड मेड साबण (Handmade soap) देखील बनवतात आणि बाजारात विकतात. चांगली गोष्ट म्हणजे हा व्यवसाय अगदी लहान प्रमाणात सुरू केला जाऊ शकतो.

Mudra Yojana
Mudra loan | महिला सक्षमीकरणासाठी मुद्रा लोन!

भारतातील साबणांची कॅटेगरी (Soap category in India)

साबणाचा वापर वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागला जाऊ शकतो.

- लॉन्ड्री सोप (Laundry Soap)

- ब्यूटी सोप (Beauty Soap)

- मेडिकेटेड सोप (Medicated Soap)

- किचन सोप (Kitchen Soap)

- परफ्यूम्ड सोप (Perfumed Soap)

Mudra Yojana
प्रधानमंत्री मुद्रा योजनेने दिली ‘नॅचरल दिशा’

मागणी (Demand) आणि बाजारपेठ (Market)लक्षात घेऊन आपण यापैकी कोणत्याही कॅटेगरीसाठी आपली उत्पादने (Products) तयार करू शकता.

4 लाखांत सुरु करा व्यवसाय (How to Start Business in 4 Lakhs)

आजच्या काळात साबणाची मागणी (Demand for soap)लहान शहरांपासून मोठ्या शहरांपर्यंत, शहरांपर्यंत आणि खेड्यांमध्ये आहे. अशा परिस्थितीत साबण बनवण्याचा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही अगदी कमी भांडवलात साबणाचा कारखाना (Soap factory) उघडू शकता. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी मोदी सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत 80 टक्के कर्ज घेऊ शकतात. मुद्रा योजनेअंतर्गत (Mudra Yojana) कर्ज घेण्याचे अनेक फायदे आहेत.

किती कमाई (Earnings)होईल?

केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेच्या प्रकल्प प्रोफाइलनुसार, तुम्ही 1 वर्षात एकूण 4 लाख किलो उत्पादन करू शकाल. त्याचे एकूण मूल्य सुमारे 47 लाख रुपये असेल. व्यवसायातील सर्व खर्च पकडून तुम्हाला 6 लाख रुपये म्हणजेच दर महिना 50,000 रुपये निव्वळ नफा होईल.

Mudra Yojana
"मुद्रा'अंतर्गत जिल्ह्यात 435 कोटींचे कर्जवाटप 

यंत्रांवर (Machines) किती खर्च केला जाईल

साबण बनवण्याचे युनिट (Soap making unit) उभारण्यासाठी आपल्याला एकूण 750 चौरस फूट जागेची आवश्यकता असेल. त्यात 500 चौरस फूट झाकलेले आणि उर्वरित उघडे असले पाहिजेत. यात सर्व प्रकारच्या मशीनसह 8 प्रकारची उपकरणे (Equipment)असतील. प्रोजेक्टच्या अहवालानुसार ही यंत्रे (Machines) बसवण्याचा एकूण खर्च एक लाख रुपये असेल.

कोणत्याही बँकेतून मिळेल कर्ज (Loan)

साबण निर्मिती युनिट्स बसवण्यासाठी एकूण 15,30,000 रुपये खर्च आहे. यात युनिट स्पेस, मशीनरी, तीन महिन्यांचे कार्यरत भांडवल (Working Capital) यांचा समावेश आहे. या 15.30 लाख रुपयांपैकी तुम्हाला फक्त 3.82 लाख रुपये खर्च करावे लागतील. उर्वरित तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज म्हणून घेऊ शकता .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.