अभिमान पुण्याचा! संकटकाळात व्हेंटिलेटर निर्मितीसाठी पुढाकार घेणारी नोकार्क स्टार्टअप

NOCCARC
NOCCARCTwitter
Updated on

निखिल कुरेले आणि हर्षित राठोर या दोघा तरुणांचे फोटो 'अभिमान पुण्याचा' या प्रसारमोहिमेंतर्गत पुण्यातील जाहीरात फलकांवर नुकतेच झळकले... खरंतर निखिल हा मूळचा मध्य प्रदेशातील शहडोल या छोट्या गावातला तर हर्षित हा उत्तर प्रदेशातील कानपूरचा.. पण दोघेही आता 'पुणेकर' झाले आहेत.. आणि त्यांनी केलेले कार्य खरंच अभिमान वाटावा असे आहे. आयआयटी कानपूरमध्ये शिक्षण घेत असताना हाॅस्टेलच्या एकाच रूममध्ये राहण्यापासून ते शिक्षण संपल्यानंतर एकत्र येत नोकार्क (NOCCARC) (जुने नाव - नोका रोबोटिक्स Nocca Robotics) ही स्वतःची स्टार्टअप कंपनी सुरू करण्याचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. विशेषतः कोव्हिड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या कालावधीत आपल्या कंपनीचे मूळ काम काही दिवसांसाठी स्थगित करून, नागरिकांसाठी व्हेंटिलेटरची निर्मिती करण्याचा त्यांचा 'उद्योग' यशस्वी ठरला आणि फक्त पुण्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील अनेक नागरिकांचे जीव वाचविण्यात ते यशस्वी झाले. (Startup mantra: Noccarc turns Covid crisis into opportunity in med-tech).

NOCCARC
झोमॅटोच्या IPO ला गुंतवणुकदारांचा मोठा प्रतिसाद

सोलर पॅनेल रोबोनिर्मिती

नोकरी करायची नाही, व्यवसाय करायचा हे निखिल आणि हर्षित यांनी आयआयटीमध्ये शिक्षण घेत असतानाच ठरविले होते. भारतामध्ये पुढील पाच वर्षात कोणत्या तंत्रज्ञानाची किंवा उत्पादनाची मागणी मोठी असेल याची यादी त्यांनी केली. सौर ऊर्जेच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारे सोलर पॅनेल साफ करण्यासाठी पाणी वापरण्यात येते, मात्र पाण्याची कमतरता आणि अशा पॅनेलच्या इन्स्टाॅलेशनच्या जागेपर्यंत पोचण्यात अडचणी येतात ही समस्या त्यांनी ओळखली. त्यावर त्यांनी उपाय शोधला. रोबोटच्या मदतीने पाणी-विरहित पद्धतीने सोलर पॅनेल साफ करण्याचे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले. त्यामुळे कंपनीचे नाव ठरविताना त्यांनी नोका रोबोटिक्स असे ठेवले. मात्र एका मोबाईल कंपनीने नामसाधर्म्याचा मुद्दा उपस्थित करीत नोटीस बजावत कायदेशीर आक्षेप घेतला. बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर कायदेशीर लढाई करत वेळ वाया घालविण्यापेक्षा निखिल व हर्षित यांनी स्टार्टअपचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि नोकार्क (NOCCARC) हे नवे नाव निश्चित केले. सोलर पॅनेल साफ करणाऱ्या पहिल्या रोबोची निर्मिती निखिल आणि हर्षित यांनी त्यांच्या हाॅस्टेलच्या खोलीत केली. मात्र नंतर त्यांच्या लक्षात आले की त्याचा आकार खूप मोठा झाला आहे आणि त्यामुळे ते खोलीबाहेर काढू शकत नाहीत. अखेर त्यांनी त्या रोबोचे भाग सुटे केले आणि बाहेर आणून पुन्हा बांधले.

NOCCARC
मास्टरकार्डला दणका; रिझर्व्ह बँकेनं केली कारवाई

आयआयटी कानपूरच्या स्टार्टअप इन्क्युबेशन अँड इनोव्हेशन सेंटरच्या (एसआयआयसी SIIC IIT Kanpur) आवारात २०१७-१८ असे दोन वर्ष या स्टार्टअपचे काम सुरू केले. २०१९ मध्ये निखिल आणि हर्षितने पुण्याला येण्याचा निर्णय घेतला. अन्य शहरांच्या तुलनेत पुणे शहर हे कमी खर्चिक आहे आणि कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांनी पुण्याची निवड केली. इंडियन एंजल नेटवर्ककडून १२.५ कोटी रुपयांची गुंतवणूक (funding) मिळविल्यानंतर घेतल्यानंतर त्यांनी भोसरी एमआयडीसीमध्ये त्यांनी जागा घेतली. मात्र काही महिन्यांतच कोव्हिड-१९ महामारीचा उद्रेक झाला आणि रोबो निर्मितीचा प्रकल्प थांबला.

NOCCARC
फक्त चार क्‍लिकसह डाउनलोड करा 'एसबीआय'चे व्याज प्रमाणपत्र !

व्हेंटिलेटरचा उद्योग

कोव्हिड-१९ च्या पहिल्या लाटेच्या वेळी निखिल आणि हर्षितला व्हेंटिलेटरविषयी फारशी माहिती नव्हती. मूलभूत विज्ञान आणि कंट्रोल मोटर्सविषयीचे ज्ञान या आधारावर त्यांनी ४८ तासांत व्हेंटिलेटरचे वर्किंग माॅडेल (Noccarc ventilator working model) बनविले. त्यानंतर व्हेंटिलेटरच्या निर्मितीसाठी कारखान्यासंदर्भात परवानग्या मिळविल्या. सर्व परवाने मिळाल्यानंतर केवळ १२ तासांत निखिल, हर्षित व त्यांच्या २१ जणांच्या टीमने पहिल्या व्हेंटिलेटरची निर्मिती केली. त्यावेळी चार ते पाच महिन्यांत नोकार्कने ३०० व्हेटिंलेटर्सची विक्री केली.

NOCCARC
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात मोठी वाढ

कोव्हिड-१९ महामारीच्या कालावधीतील अनुभवांविषयी बोलताना निखिल म्हणाला, "पहिल्या लाटेनंतर आम्ही आमचे काम अखंडित सुरू ठेवले. दुसरी लाट येण्याची चिन्ह दिसताच आम्ही पूर्ण तयारी सुरू केली. त्यामुळे दुसऱ्या लाटेच्या कालावधीत केवळ ४० ते ५० दिवसांत आम्ही २७०० व्हेंटिलेटरची विक्री केली. नफा कमविणे हा आमचा हेतू कधीच नव्हता. या कालावधीत आमच्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही जीव ओतून काम केले. दिवसाला ३० व्हेंटिलेटरची निर्मिती क्षमता वाढून त्यांनी ती १०० पर्यंत नेली. आम्ही या सर्व कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार दिला. आता महाराष्ट्रामध्ये नोकार्कचे ९०० तर एकट्या पुणे शहरात १५० हून अधिक व्हेंटिलेटर्सची विक्री केली आहे. एका व्हेंटिलेटरची किंमत ही ४ ते ५ लाख रुपये आहे. आता तर नोकार्कच्या प्रत्येक व्हेंटिलेटरवर एक संपर्क क्रमांक छापलेला आहे. कोणत्याही हाॅस्पिटल, डाॅक्टर किंवा अन्य ग्राहकाने संपर्क केल्यास त्याला थेट नोकार्कच्या कार्यालयातून प्रतिसाद दिला जातो. याचा फायदा विशेषतः छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये होत आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.