SBI च्या 40 कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, आधार कार्ड जोडा अन्यथा...

sbi 1.jpg
sbi 1.jpg
Updated on

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआय खातेदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बँकेने आपल्या खातेधारकांना आधार कार्डबरोबर आपले खाते लिंक करणे अनिवार्य केले आहे. बँकेने ही माहिती आपल्या अधिकृत टि्वटर अकाऊंटवरुन दिली आहे. एसबीआयमधील बचत खात्याशी आधार लिंक करण्याच्या चार पद्धती आहेत. ATM, इंटरनेट बँकिंग, शाखेत जाऊन किंवा SBI च्या ऍपवरुन आधार कार्ड लिंक करता येईल. 

का आवश्यक आहे आधार कार्ड
जर तुम्ही एखाद्या सरकारी योजनेचा फायदा घेत असाल किंवा तुमच्या खात्यात गॅस किंवा इतर सबसिडी जमा होत असेल. तर आधार कार्ड खात्याबरोबर जोडणे आवश्यक आहे, असे एसबीआयने म्हटले आहे. 

आपल्या खात्याशी आधार लिंक करण्याच्या चार पद्धती आहेत. सर्वात आधी नेट बँकिंगबाबत जाणून घेऊयात.

एसबीआय कॉर्पोरेट वेबसाइट bank.sbi किंवा www.sbi.co.in वर जाऊन मेन पेज बॅनर Link your AADHAAR Number with your bank (आपल्या आधार नंबरला आपल्या बँक खात्याशी जोडा) वर आपला आधार नंबर जोडण्यासाठी स्क्रिनवर दिसत असलेल्या सूचनांचे पालन करा. 

मॅपिंगच्या स्थितीची माहिती आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर दिली जाईल. एसबीआय इंटरनेट बँकिंग पोर्टल www.onlinesbi.com वर लॉग इन करा. स्क्रिनच्या डाव्या बाजूस दिसत असलेल्या “My Accounts” (माझे खाते) मधील “Link your Aadhaar number” (आपला आधार नंबर जोडा) वर जा. पुढच्या पानावर अकाऊंट नंबर निवडा, आधार नंबर टाका आणि सबमिट करा. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरच्या अखेरचे दोन अंक (त्यांना बदलले जाऊ शकत नाही) दिसतील. मॅपिंगच्या स्थितीची माहिती तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर दिली जाईल. 

बँकेच्या शाखेत जाऊन करता येणार
एसबीआयच्या शाखेत जाऊनही तुम्हाला आधार कार्ड लिंक करता येईल. यासाठी तुम्हाला आधारची झेरॉक्स कॉपी घेऊन जावी लागेल. त्यानंतर बँकेत तुम्हाला एक अर्ज मिळेल. तो अर्ज भरुन आधार कार्डची झेरॉक्स कॉपी शाखेत जमा करावी लागेल. व्हेरिफिकेशननंतर तुमचा आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याशी लिंक केला जाईल. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर याबाबतचा एक मेसेज देखील येईल. 

SBI ऍपच्या माध्यमातून आधार कार्ड लिंक करण्याची पद्धत
जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक आहात आणि आपल्या स्मार्टफोनमध्ये एसबीआय एनीवेअर ऍप वापरत असाल तर तुम्ही सहज आधारला बँक अकाऊंट लिंक करु शकता. एसबीआय ऍपमध्ये लॉग इन आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा. मेन पेजवर रिक्वेस्ट बटनवर जाऊन त्यानंतर आधार टॅबवर गेल्यानंतर आधार लिंकिंगवर जा. आता तिथे आपला CIF निवडा. त्यानंतर आधार नंबर टाका आणि नियम आणि अटी मंजूर बॉक्सवर जा. एसबीआय तुम्हाला बँक अकाऊंट आणि आधार लिंक झालेला मेसेज तुमच्या नंबरवर पाठवेल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.