नवी दिल्ली - आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत स्टेट बँकेने (एसबीआय) ४५७४ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीपेक्षा हे प्रमाण ५१.८८ टक्क्यांनी जास्त आहे. एप्रिल ते जून २०२० च्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा ४१८९ कोटी रुपये होता.
US Election 2020: राष्ट्राध्यक्षपदापासून बायडन केवळ 6 पावलं दूर तर ट्रम्प गेले कोर्टात
दुसऱ्या तिमाहीत बँकेचा ऑपरेटिंग नफा (अपवादात्मक गोष्टी वगळता) ११.६६ टक्क्यांनी वाढून १६,४६० कोटी रुपयांवर गेला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत १४,७१४ कोटी रुपये होता. पहिल्या तिमाहीत ऑपरेटिंग नफा १६,५२१ कोटी रुपये नोंदविला गेला.जुलै ते सप्टेंबर या कालावधीत स्टेट बँकेचे एकूण व्याजउत्पन्न २८,१८१ कोटी रुपये होते, जे याच कालावधीतील गेल्या वर्षीच्या २४,६०० कोटी रुपयांच्या व्याजउत्पन्नापेक्षा १४.५६ टक्क्यांनी अधिक आहे. दुसऱ्या तिमाहीत कामगिरी चांगली असल्याचे बँकेने निवेदनात म्हटले आहे.
US Election 2020: यंदाची निवडणूक सर्वार्थाने वेगळी; पहिल्यांदाच घडल्यात काही गोष्टी
बँकेने नफा, भांडवली पर्याप्तता प्रमाण आदींमध्ये सुधारणा केली आहे. बँकेची एकूण थकीत कर्जे (एनपीए) पहिल्या तिमाहीत ५.२८ टक्के होती, तर गेल्यावर्षी याच तिमाहीत ७.१९ टक्के होती. या तिमाहीत निव्वळ थकीत कर्जे १.५९ टक्के होती, तर पहिल्या तिमाहीत १.८६ टक्के आणि गेल्यावर्षी दुसऱ्या तिमाहीत २.७९ टक्के होती.
US election 2020: सारा मॅकब्राईड अमेरिकेतील पहिल्या ट्रान्सजेंडर सिनेटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.