तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल, तर एमर्जन्सी परिस्थितीत तुम्ही एसबीआयकडून शेअर्सच्या बदल्यात कर्ज घेऊ शकता.
अनेकांनी भविष्याचा विचार करुन शेअर्समध्ये पैसे गुंतवलेले असतात, पण काही वेळा तुम्हाला तातडीने पैशांची गरज पडते, मग अशावेळी काय करावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया याबाबत तुमची मदत करू शकते. तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुम्ही एसबीआयकडून शेअर्सवर कर्ज घेऊ शकता. SBI ग्राहकांना शेअर्सवर कर्ज (sbi loan against shares) देते.
कोणाला मिळू शकते कर्ज ?
शेअर्सच्या बदल्यात तुम्हाला एसबीआयकडून 50 हजार ते 20 लाख रुपयांचे किमान कर्ज मिळू शकते. जर तुम्हाला आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला 10 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज मिळू शकणार नाही. या कर्जाची परतफेड जास्तीत जास्त 30 महिन्यांच्या कालावधीत करावी लागेल. तुम्हाला सिक्युरिटी म्हणून ऑफर केल्या जाणाऱ्या शेअर्सच्या सध्याच्या बाजार मूल्याच्या 50 टक्के मार्जिन रक्कम भरावी लागेल.
फी किती ?
शेअर्सच्या बदल्यात कर्जाच्या रकमेच्या 0.75 टक्के प्रक्रिया शुल्क (Processing Fee) भरावी लागेल. ही फी किमान 1000 रुपये + जीएसटी असेल. तसेच 1000 रुपये + लागू जीएसटी भरावा लागेल. हे फक्त ओव्हरड्राफ्ट खात्यासाठी आहे. तुम्हाला ओव्हरड्राफ्ट सुविधेवर लागू होणारे 550 रुपये अकाउंट किपिंग चार्ज + जीएसटी भरावा लागेल.
बचत खाते (Savings Account) किमान सहा महिने जुने असावे
तुम्ही या कर्जासाठी तेव्हाच अर्ज करू शकता जेव्हा एसबीआयमध्ये तुमच्या बचत खात्याला सहा महिने पूर्ण झाले असतील. खात्यात दिलेला ई-मेल आयडी सुरु असणे आवश्यक आहे. कर्जावरील व्याज बँकेने निश्चित केलेल्या दरानुसार भरावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.