SBI Home loan monsoon dhamaka : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी मोठी मान्सून ऑफर आणली आहे. आपल्या ग्राहकांना होम लोन म्हणजेच गृह कर्जावर (Home Loan) मोठी सूट देत बँकेने मान्सून धमाका ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरची खासियत म्हणजे SBI ने आपल्या गृहकर्जावरील प्रोसेसिंग फी ही शंभर टक्के माफ केली आहे. मात्र ही ऑफर मर्यादित काळापुरतीच असणार असल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं आहे. ग्राहक या ऑफरचं फायदा ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत घेऊ शकतात. (Finance News in Marathi)
स्टेट बँक ऑफ इंडियाने याबाबत त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ट्विट देखील केलं आहे.
SBI ने आपल्या धिकृत ट्विटर हॅण्डलवरून केलेल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, नवीन घर घेणाऱ्यांसाठी ऑफर्सचा पाऊस Home Loan Offers आता शून्य प्रोसेसिंग फी सोबत अप्लाय करा.
Home loan processing fees - प्रोसेसिंग फी किती असते ?
SBI कडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या एकूण कर्जाच्या रकमेच्या ०.४० टक्के प्रोसेसिंग फी आकारली जाते. या ऑफरच्या माध्यमातून ही प्रोसेसिंग फी हटवल्यामुळे ग्राहकांना याचा चांगलाच फायदा होईल असं स्टेट बँक ऑफ इंडोदियाकडून सांगण्यात येत आहे. मात्र ही ऑफर मर्यादित वेळेकरताच असणार असल्याची माहिती बँकेने दिली आहे. सध्या बँकेकडून आपल्या गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना वार्षिक ६.७ टक्क्यांनी कर्ज देण्यात येत आहे.
ग्राहकांचा फायदा
स्टेट बँक ऑफ इंडिया ( State Bank Of India ) चे व्यवस्थापकीय संचालक सी एस शेट्टी म्हणालेत की, ''आम्हाला आमच्या संभावित गृहकर्ज धारकांसाठी मान्सून धमाका ऑफरची जोश्ना करताना अत्यंत आनंद होत आहे. आम्हाला असं वाटतं की, प्रोसेसिंग फी माफ करण्याच्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे गृहकर्जदारांना गृहकर्ज निवडणं सोपं होईल. सध्या गृहकर्जावरील व्याजदर (Home loan interest rates ) हे नीचांकी पातळीवर आहेत.''
SBI home loan - इतर ऑफर्स काय आहेत ?
याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सांगण्यात आलं आहे की, जर संभाव्य ग्राहकांनी SBI YONO या मोबाईल ऍपवरून कर्जासाठी निवेदन केल्यास त्यांना अधिकच्या पाच अंकांची सूट मिळू शकते. आधण महिला कस्टमर्स साठी देखील पाच आधार अंकांची सूट दिली जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.