गुरुवारी शेअर बाजारात घसरण, जाणून घ्या आज कशी असेल स्थिती?

बाजाराने ऑक्टोबरची कमकुवत सुरुवात केली आहे.
Share Market
Share MarketSakal
Updated on

- शिल्पा गुजर

बाजाराने ऑक्टोबरची कमकुवत सुरुवात केली आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या दिवशी, नफा-बुकिंगने बाजारात वर्चस्व गाजवले. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही घसरणीसह बंद झाले, रिअल्टी आणि कंझ्युमर ड्यूरेबल शेअर्समध्ये खरेदी कायम राहिली. गुरुवारी सेन्सेक्स 287 अंकांनी घसरून 59,126 आणि निफ्टी 93 अंकांनी घसरून 17,618 वर बंद झाला. बँकिंग शेअर्समध्येही विक्री दिसून आली. पण गुरुवारी मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये वाढ झाली. पण सप्टेंबरच्यामध्ये सेन्सेक्स-निफ्टी सुमारे 3 टक्के वाढला आहे. मीडिया-रियल्टी इंडेक्सने 30 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

Share Market
साखर क्षेत्राचे भवितव्य आशावादी; एफआरपी, एमएसपीचे निर्णय महत्वाचे

रिअल्टीसह, कंझ्युमर ड्यूरेबल शेअर्समध्ये गुरुवारी चांगली खरेदी झाली. फार्मा, पॉवर शेअर्समध्येही खरेदी झाली. दुसरीकडे मेटल, ऑटो, आयटी शेअर्समध्ये घसरण झाली. निफ्टीचे 50 पैकी 40 शेअर्स घसरले. सेन्सेक्सच्या 30 पैकी 23 स्टॉक्सची विक्री झाली. निफ्टी बँकेचे 12 पैकी 8 शेअर्स दबावाखाली राहिले. कमकुवत जागतिक संकेतांमुळे गुरवारी दिवसाच्या उत्तरार्धात व्यापार आणखी घसरल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर यांनी सांगितले. अमेरिकेच्या कर्जाची कमाल मर्यादा आणि रोखे उत्पन्नात वाढ यामुळे बाजारात दबाव निर्माण झाला. या व्यतिरिक्त, ऑगस्टसाठी कोर सेक्टर डेटा येण्यापूर्वी बाजार सावध दिसत आहेत असेही नायर म्हणाले.

मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया यांचा टेक्निकल व्ह्यू

निफ्टीने गुरुवारी डेली चार्ट वर बियरिश कँडल बनवली आणि सुमारे 90 गुणांच्या घसरणीसह बंद झाली. आता निफ्टी 17,777 आणि 17,850 वर जाण्यासाठी 17,580 वर सपोर्ट घ्यावा लागेल. निफ्टीसाठी आता सपोर्ट 17,450 आणि 17,350 च्या दिशेने घसरताना दिसत आहे. निफ्टीमध्ये 17,300-18,000 वर कंसोलीडेशन बघायला मिळेल असे एलकेपी सिक्युरिटीजचे रोहित सिंगरे म्हणाले. इथे येणारा कोणताही ब्रेकआउट त्याची दिशा ठरवेल.

शुक्रवारी म्हणजेच आज कोणत्या शेअर्सवर ठेवाल नजर ?

  1. बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  2. बजाज फिनसर्व लिमिटेड (BAJAJFINSV)

  3. टाटा मोटर्स (TATAMOTORS )

  4. एनटीपीसी (NTPC)

  5. सनफार्मा (SUNPHARMA)

  6. आयडिया (IDEA)

  7. टाटापॉवर (TATAPOWER)

  8. फेडरल बँक (FEDERALBNK)

  9. अशोक लेलँड (ASHOKLEY)

  10. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL)

(नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()