Share Market: शेअर बाजारात सध्या प्रचंड अस्थिरता आहे, त्यामुळे अनेक गुंतवणूकदार काळजीत आहेत. बाजारातील गोंधळात गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात काळजीपूर्वक खरेदी करणे आवश्यक आहे. सध्या तिमाही निकालांमुळे काही शेअर्समध्येही चांगली आणि जोरदार तेजी दिसून येत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल किंवा एखादा चांगला स्टॉक शोधत असाल तर तुम्ही मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांच्या सल्ल्याने खरेदी करू शकता. बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी गुंतवणूकदारांसाठी मजबूत स्टॉक निवडला आहे. Kennametal India या शेअरमध्ये गुंतवणुकदारांनी पैसे गुंतवावे असा सल्ला त्यांनी दिला आहे. (Stock market experts have advised investors to invest in Kennametal India.)