Mahindra and Mahindra कंपनी ठरली मल्टीबॅगर, गुंतवणूकदारांना केले मालामाल…

अवघ्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करणारी महिंद्रा अँड महिंद्रा मल्टीबॅगर ठरली आहे
Mahindra and Mahindra
Mahindra and Mahindrasakal
Updated on

अवघ्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करणारी महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra) मल्टीबॅगर ठरली आहे. त्यांनी 20 वर्षांत गुंतवणूकदारांच्या एक लाखाचे एक कोटी बनवलेत. आता तज्ज्ञांना यात आणखी तेजीचा कल दिसत आहे.
ब्रोकरेज फर्म एडलवाईसने एका महिन्यापर्यंतच्या शॉर्ट टर्म च्या गुंतवणुकीसाठी 1355 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे. सध्याच्या किमतीपेक्षा ही किंमत 8.57 टक्के वर आहे. त्याचे शेअर्स गुरुवारी बीएसईवर 1248 रुपयांवर ट्रेड करत होते.

Mahindra and Mahindra
Stock: 34 वरुन थेट 586 रुपयांवर, या शेअरने दिला 1,600% रिटर्न...

एक लाखाच्या गुंतवणुकीचे कोट्यधीश
एसयूव्ही, पिकअप, हलकी आणि जड व्यावसायिक वाहने, दुचाकी आणि ट्रॅक्टरची प्रमुख उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स 18 ऑक्टोबर 2002 रोजी 10.60 रुपयांवर व्यापार करत होती. सुमारे 20 वर्षांनंतर आता त्याची किंमत 1248 रुपये झाली आहे. म्हणजे त्यावेळी गुंतवलेले 1 लाख रुपये आता 118 पटीने वाढून 1.18 कोटी रुपये झाले असते.

Mahindra and Mahindra
Stock : बँकिंग स्टॉक येत्या काळात देईल 56% नफा, आता गुंतवणूकीची चांगली संधी...

तेजीचा कल
महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स गुंतवणूकदारांना केवळ लाँग टर्मच नाही तर शॉर्ट टर्ममध्ये पण चांगला परतावा देत आहेत. या वर्षी 8 मार्च रोजी हा शेअर 671 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर घसरला होता. पण, त्यानंतर खरेदी वाढली आणि त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत हा शेअर 103.56 टक्क्यांनी वाढून 1365.90 रुपयांवर पोहोचला, जो 52 आठवड्यांचा विक्रमी उच्चांक आहे. सध्या हे शेअर्स डिस्काऊंटवर मिळत आहेत. त्यामुळेच ब्रोकरेज फर्म एडलवाईसने 1355 रुपयांच्या टारगेटसह 1225 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवून यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

Mahindra and Mahindra
Sugar Stock: फक्त 55 रुपयांचा 'हा' स्टॉक वाढवेल तुमच्या पोर्टफोलिओची गोडी

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.