सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Share Market
Share Marketesakal
Updated on

देशांतर्गत शेअर बाजाराची वाढ गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहिली. BSE सेन्सेक्स 400 हून अधिक अंकांनी वाढला, तर NSE निफ्टीने 17,600 अंक ओलांडला.


शेअर बाजार प्री-ओपन सत्रापासूनच वाढीची चिन्हे दाखवत होता. SGX निफ्टीमधूनही बाजार एकतर स्थिर राहू शकतो किंवा वाढीसह उघडू शकतो कळत होते. बाजार उघडताच सेन्सेक्स सुमारे 300 अंकांनी वाढला. पण आरबीआयच्या धोरणात्मक बैठकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच बाजाराने सर्व नफा गमावला आणि रेड झोनमध्ये गेला. पण नंतर जोरदार रिकव्हरी झाली आणि सलग तिसऱ्या दिवशी नफ्यात राहिला.

Share Market
क्रिप्टोकरन्सी आर्थिक स्थिरतेसाठी धोकादायक : शक्तिकांत दास

दिवसअखेर सेन्सेक्स 460.06 अंकांनी (0.79 टक्क्यांनी) वाढून 58,926.03 अंकांवर बंद झाला. निफ्टीही 142.05 अंकांच्या (0.81 टक्के) वाढीसह 17,605.85 वर बंद झाला. गुरूवारी ऑटो वगळता सर्व क्षेत्र ग्रीन झोनमध्ये बंद झाली. निफ्टी बँक 3 सेशनमध्ये 1000 च्या वर गेली आहे. या तीन दिवसांत निफ्टी फायनान्शिअल 2.5 टक्क्यांनी वधारला आहे. निफ्टी मीडिया सर्वात जास्त 1.5 टक्क्यांनी वाढला. ओएनजीसी, टाटा स्टील, इन्फोसिस, एसबीआय लाईफ या कंपन्यांनी बाजार वाढण्यास मदत केली.

Share Market
महिंद्रा अँड महिंद्राच्या नफ्यात 57 टक्क्यांची वाढ

आजचे टॉप 10 शेअर्स पाहुयात ?


ओएनजीसी (ONGC)

टाटा स्टील (TATASTEEL)

इन्फोसिस (INFOSYS)

एसबीआय लाईफ (SBILIFE)

एचडीएफसी बँक (HDFCBANK)

एलआयसी हाउसिंग फायनान्स (LICHSGFIN )

फेडरल बँक (FEDERALBNK)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

ग्रामीण विद्युकरण निगम लिमिटेड (RECLTD)

श्रीराम ट्रांसपोर्ट फायनान्स कंपनी लिमिटेड (SRTRANSFIN)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.