Stock Market
Stock Marketesakal

Stock Market : केवळ 2 वर्षात 'या' स्टॉकने एका लाखाचे केले एक कोटी

या स्टॉकने गेल्या 2 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा देऊन कोट्यधीश बनवले आहे.
Published on


मुंगीपा सिक्युरिटीज लिमिटेडच्या ( Moongipa Securities Limited) शेअर्समध्ये पुन्हा एकदा 5 टक्क्यांचे अपर सर्कीट लागले आणि ते 256.55 रुपयांच्या ऑल टाईम हायवर पोहोचले.

मुंगीपा सिक्युरिटीजने सलग चौथ्या दिवशी हे अपर सर्किट गाठले आहे. या 4 दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये 21.50 टक्क्यांची तेजी दिसली आहे. सुमारे 1,000 कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेले मुंगीपा सिक्युरिटीजचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक्समध्ये गणले जातात. त्यांनी गेल्या 2 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा देऊन कोट्यधीश बनवले आहे. (Stock Market this stock gave investors best return 1 lakh turned into 1 crore in two years)

मुंगीपा सिक्युरिटीजचे शेअर्स 2 वर्षांपूर्वी अर्थात 11 डिसेंबर 2020 रोजी बीएसईवर 2.30 रुपयांवर होता. अशाप्रकारे, गेल्या 2 वर्षात या स्टॉकच्या किमतीत 11,000% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने 2 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते त्याचे आज 1.10 कोटी झाले असते.

मुंगीपा सिक्युरिटीजच्या शेअर्सनी यावर्षीही आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. 2022 च्या सुरूवातीला, त्याचे शेअर्स बीएसईवर 31.95 रुपयांवर होते, जे आता वाढून 256.55 रुपये झाले आहेत.

केवळ यावर्षी आतापर्यंत त्याचे शेअर्स 700% पेक्षा जास्त वाढले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला जर एखाद्या गुंतवणूकदाराने या कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आज 8 लाख रुपये झाले असते.

Stock Market
Share Market : बाजारात पडझड, 'या' मोठ्या आयटी अन् बँकीग शेअसर्मध्ये मोठी घसरण

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांचीही या कंपनीत गुंतवणूक आहे. सप्टेंबर 2022 च्या अखेरीस कचोलिया यांच्याजवळ कंपनीत 301,000 शेअर्स अर्थात सुमारे 1.1 टक्के हिस्सेदारी आहे.

मूंगीपा सिक्युरिटीज हे सेबी-नोंदणीकृत ब्रोकर आहे, जे ब्रोकिंग, डिस्ट्रीब्यूशन, इनव्हेस्टमेंट रिसर्च, ऑनलाइन ट्रेडिंग, वेल्थ मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि इंश्युरंस संबंधित सेवा देते.

Stock Market
Share Market : बाजार घसरणीसह बंद, Tata च्या 'या' शेअर्सला मोठा फटका

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.