'अनलॉक'थिम स्पेशल ; कुठे आहे भरभक्कम पैसे कमवण्याची संधी

Share Market
Share MarketSakal
Updated on
Summary

महाराष्ट्र,दिल्ली, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये अनलॉक होताना सोमवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी पुन्हा एकदा नवीन उच्चांक गाठणारा ठरला.

एकीकडे देशातला कोरोनाचा आकडा कमी होतोय. देशातील कोरोना केसेस कमी झाल्याने देश पुन्हा अनलॉक होतोय. महाराष्ट्र,दिल्ली, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये अनलॉक होताना सोमवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी पुन्हा एकदा नवीन उच्चांक गाठणारा ठरला. निफ्टी,सेन्सेक्स आणि बँक निफ्टी सोमवारच्या सत्रात हिरव्या निशाणीवर बंद झालेत. (FII)परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोमवारच्या सत्रात १८६.४६ करोड रुपयांची कॅश मार्केटमध्ये विक्री केली तर दुरीकडे देशातील संस्थात्मक गुंतवणूकदारांनी म्हणजेच (DII)नी ९३८.९७ करोड रुपयांची कॅश मार्केटमध्ये भरभक्कम खरेदी केली.

अशात आजच्या सत्रात देखील भारतीय शेअर बाजारात तेजी कायम राहण्याचे संकेत मिळत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. एकीकडे अनलॉक होत असताना उद्याच्या सत्रात खालील सेक्टरवर ठेवा नजर :

हॉटेल सेक्टरमधील हे आहेत शेअर्स :

- इंडियन हॉटेल

- ओरिएंट हॉटेल

- इ आय एच - EIH

- स्पेशालिटी रेस्टॉरंट

- बर्गर किंग

- बार्बेक्यू नेशन

मल्टिप्लेक्स सेक्टर

- आयनॉक्स

- PVR

digital-investment
digital-investment
Share Market
सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव

टूर्स अँड ट्रॅव्हल सेक्टर :

- थॉमस कुक

- महिंद्रा हॉलिडेज

- IRCTC

- स्पाईज जेट

- इंटरग्लोबल एव्हिएशन

रिटेल सेक्टर

- शॉपर्स स्टॉप

- V मार्ट रिटेल

- V 2 रिटेल

- ट्रेंट

- AB फॅशन

Share Market
वर्ल्ड बँक भारताला देणार ५० कोटी डॉलर

याशिवाय तुम्हाला शुगर सेक्टरवर देखील नजर ठेवायला हवी. साखर कंपन्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात एथोनॉलची निर्मिती केली जाते. अशात पुढील दोन वर्षात इंधनामध्ये २० टक्के इंथेनॉलचा वापर केला जाणार आहे. यामुळे साखर कंपन्यांच्या नफ्यात येत्या काळात अधिक वाढ होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे साखर कंपन्यांच्या समभागांवर विशेष लक्ष ठेवायला हवं. यामध्ये श्री. रेणुका शुगर,बालरामपूर चिनी, EID पॅरी, आंध्र शुगर,दालमिया शुगर या शेअर्सवर लक्ष ठेवा. या शेअर्समध्ये तुम्हाला पैसे कमावण्याची संधी आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट,शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो,शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.