यंदा स्टील सेक्टरमध्ये मजबूत वाढ अपेक्षित, SAIL ला सर्वात जास्त फायदा होणार

Strong growth in the steel sector this year will be the biggest beneficiary of SAIL
Strong growth in the steel sector this year will be the biggest beneficiary of SAIL
Updated on

SAIL stock : आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या सहामाहीत स्टील मार्जिन रिकव्हरी होण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी, 2022 मध्ये देखील स्टीलच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ होण्याची अपेक्षा आहे. यामुळे काही आघाडीच्या स्टील कंपन्यांचा नफा आणि मार्जिन सुधारण्याची शक्यता आहे. याचा फायदा Steel Authority of India (SAIL) ला सगळ्यात जास्त होऊ शकतो. कंपनीला त्याच्या विस्तार योजनेचा आणि पुढे जाऊन चीनमधील उत्पादन कपातीचा फायदाही मिळेल. या बाबी लक्षात घेऊन ब्रोकरेज हाऊस अॅक्सिस सिक्युरिटीजने या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे आणि 150 रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. सध्याच्या किमतीच्या बाबतीत, यामध्ये 42% परतावा मिळू शकतो.


ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या सहामाहीत स्टील मार्जिनवर दबाव होता. पण नंतर मार्जिनवरील दबाव कमी होण्याची अपेक्षा आहे. चीन सरकार स्टील निर्यातीवरील प्रोत्साहन सतत कमी करत आहे. त्याचवेळी चीनमधील स्टील उत्पादनातही घट अपेक्षित आहे. या सगळ्याचा फायदा भारतीय उद्योगांना मिळणार आहे.

Strong growth in the steel sector this year will be the biggest beneficiary of SAIL
आज शेअर बाजारात काय घडेल ? जाणून घ्या टॉप 10 शेअर्सची लिस्ट


स्टीलच्या किंमती वाढणार स्टीलच्या वाढलेल्या किमतींमुळे कंपन्यांच्या मार्जिनमध्ये आणि नफ्यात सुधारणा होईल असे ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे . सेलची (SAIL) आणखी विस्ताराची योजना आहे. कंपनी आपली क्षमता वाढवण्यावर भर देत आहे. विस्तार योजना 2024 पासून सुरू होऊ शकते. कंपनीने 2021 मध्ये मजबूत EBITDA आणि कमी कॅपेक्ससह 19,758 कोटी FCF नोंदवले होते. FY22E/FY23E/24E मध्ये देखील कंपनीचा FCF 17,985 कोटी, 14,027 कोटी आणि 13,656 कोटी असू शकतो. कंपनीने आपले कर्ज सातत्याने कमी केले आहे. कंपनीचा PAT मजबूत आहे आणि FY22 ते FY24 पर्यंत पेआउट रेशो 28 टक्के राखला जाण्याची अपेक्षा आहे.


राकेश झुनझुनवालांचीही गुंतवणूक

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा सप्टेंबर तिमाहीपर्यंत SAIL मध्ये 1.8 टक्के हिस्सा आहे. डिसेंबर तिमाहीसाठी कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न अद्याप समजला नाही. जूनच्या तिमाहीत त्यांनी कंपनीतील 1.4 टक्के हिस्सा खरेदी केला होता. जे सप्टेंबरच्या तिमाहीत 1.8 टक्क्यांपर्यंत वाढले होते. त्यांच्याकडे कंपनीचे 72,500,000 शेअर्स आहेत, ज्यांचे सध्याचे मूल्य 773.6 कोटी रुपये आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.