सक्सेस स्टोरी  : ‘वेड  मी  गुड’

Anand-Shahani-Mehak-Shahani
Anand-Shahani-Mehak-Shahani
Updated on

आनंद शहानी आणि मेहक सागर (शहानी) २०१० मध्ये इंटर्नशिप दरम्यान एका हेल्थ न्यूट्रिशन कंपनीत भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. चार वर्षांच्या ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’नंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. आपल्या लग्नाचे नियोजन करीत असताना या दोघांना योग्य ठिकाण शोधणे, बँड-बाजा आणि जेवण बनविणाऱ्यांचा शोध घेण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या अडचणी असह्य झालेल्या या दोघांनी, नंतर ‘वेड मी गुड’ या नावाचा लग्नाच्या गोष्टींसंदर्भात ब्लॉग लिहायला सुरुवात केली. 

आनंद म्हणतात, ‘‘आमच्या लक्षात आले, की भारतात खरोखरच अशा ‘वेडिंग ब्लॉग’चा अभाव आहे, ज्यावर लोक खरोखर विश्वास ठेवू शकतात आणि त्यांच्याशी संपर्क साधू शकतात. म्हणूनच आम्ही ‘वेडिंग ब्लॉग’ या संकल्पनेसह लग्न करण्याचा निर्णय घेतला; ज्यामुळे जोडप्यांना सुंदर दिसण्यासाठी ब्युटिशियन, हेअरस्टायलिस्ट अशा तज्ज्ञांची निवड कशी करावी, बजेटमध्ये विवाह कसा करावा हे तर कळेलच, पण त्यासोबतच अलीकडेच लग्न केलेल्या जोडप्यांच्या कल्पना आणि अनुभवही कळू शकेल.’’ 

‘वेड मी गुड’ हे एक वेडिंग पोर्टल आहे, जे आधुनिक भारतीय विवाहाच्या नियोजन करण्यास जोडप्यांना मदत करते. 

मेहक म्हणतात, ‘‘आम्ही आधुनिकतेवर भर देतो, कारण आमच्या वस्तू आजच्या अशा पिढीसाठी बनविल्या गेल्या आहेत, ज्यांना कॅन्डिड आणि पारंपारिक फोटोग्राफीमधील फरक समजतो, ज्यांना लग्नात काहीतरी ‘युनिक’ आणि वेगळे करायचे आहे.’’

‘वेड मी गुड’ लग्नाच्या संदर्भातील सर्व सुविधा पुरवितात. यामध्ये ब्रायडल मेकअप, मेहंदी, डेस्टिनेशन वेडिंगसाठीचे ठिकाण निवडणे, त्याचे बुकिंग करणे, तिथपर्यंतच्या प्रवासाची तिकिटे बुक करणे, फोटोग्राफर निवडणे, केटरिंग सुविधा, कपडे डिझाइन करणे, लग्नपत्रिका तयार करणे, अशा अनेक सुविधा पुरविल्या जातात. या दोघांचा असा विश्वास आहे, की सध्या बाजारात लग्नासंदर्भात सुविधा देणाऱ्या अनेक वेबसाइट्स आहेत, कारण याला खूप मागणी आहे. परंतु, आपण वेगळे काही तरी दिले पाहिजे, तरच आपण यात टिकून राहू शकू.

यावर मेहक म्हणतात, ‘‘आमचे वेगळेपण अनेक गोष्टींमध्ये आहे. आम्ही एक ‘डिरेक्टरी’ नाही आहोत, ज्यामध्ये ज्याला हवे त्याला स्थान मिळू शकेल. आमच्या इथे उपलब्ध असलेल्या यादीमध्ये तेच लोक असतात, ज्यांना आम्ही स्वतःहून सर्व गोष्टी तपासून आमंत्रित केलेले असते. दुसरे म्हणजे, आम्ही देत असलेली माहिती ही आमची सर्वांत मोठी ताकद आहे. ‘वेड मी गुड’ या ब्लॉगमधून आम्ही विशेष माहिती देत असतो, ज्यामध्ये लग्न करताना कोणत्या अडचणी येऊ शकतात आणि त्यावर उपाय कसा शोधावा, याबद्दल सांगत असतो.’’ 

सध्या ‘वेड मी गुड’ची उलाढाल १४३ कोटी रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.