कर्ज मग ते कोणत्याही प्रकारचे असो, सर्वसामान्यांना ते बँकेकडून घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच तुम्ही एखाद्या एजंटामार्फत कर्ज घेत असाल तर मग तुमचे काम सोपे होईल, असे वाटत असले तरी तसे होत नाही. कारण, एजंटाने तुम्हाला दिलेली आश्वासन प्रत्यक्षात बँक पूर्ण करतेच, असे नाही. त्यामुळे बहुतांश वेळेला केवळ ग्राहक मिळावेत, या हेतूने चुकीची आश्वासने एजंट देत असतात आणि या आश्वासनांना सर्वसामान्य माणूस बळी पडतो. मग अशा वेळी पर्याय काय, या प्रश्नाचे उत्तर म्हणूनच सुरू झाले चेन्नईस्थित स्टार्टअप ‘बँक बाजार’!
‘बँक बाजार’ या कंपनीचे संस्थापक असणाऱ्या अधिल शेट्टी यांचा भाऊ अर्जुन आणि त्याची पत्नी रती शेट्टी गृहकर्ज घेण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु, एजंट त्यांना देत असलेली आश्वासने बँक प्रत्यक्षात पूर्ण करीत नसल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागत होता. तेव्हाच अधिल, अर्जुन आणि रती यांनी लोकांचे हे काम सुकर करण्याच्या हेतूने ‘बँक बाजार’ची स्थापना करायचे ठरवले.
हेही वाचा - Home Loan: आता होम लोनही महागणार, SBI ने वाढवले व्याजदर
पुढील दोन आठवड्यांमध्ये स्टार्टअपचा विचार पक्का करून पेशाने इंजिनिअर असलेले अधिल मल्टीनॅशनल कंपनीतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून चेन्नईत परतले. तसेच अर्जुन आणि रती यांनीही मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडल्या. स्टार्टअप सुरू करण्यासाठी चेन्नईची निवड का केली, असे विचारल्यावर अधिल म्हणतात, ‘माझे इंजिनिअरींगचे शिक्षण चेन्नईत पूर्ण झाले. त्यामुळे इंजिनिअरिंगचे माझे सहकारी मला मदत करायला तयार होते आणि आमच्या सर्वांसाठी चेन्नई हे शहर ओळखीचे असल्याने आम्ही चेन्नईची निवड केली.’
अखेर २००८ मध्ये ‘बँक बाजार’ हे छोटे स्टार्टअप सुरू झाले. सुरवातीला ४५ लाख रुपये भांडवलाची गुंतवणूक करून, अवघ्या सहा लोकांसह त्यांनी सुरवात केली. त्यावेळी इंटरनेट ही सुविधा नवी असल्याने अनेक बँका ऑनलाइन सेवेवर हवा तेवढा विश्वास दाखवत नव्हत्या. त्यामुळे बँकांची नोंदणी वेबसाइटवर करून घेणे त्यांना कठीण जात होते. परंतु, त्याचवेळी काही बँका ऑनलाइन सेवेत पदार्पण करू इच्छित होत्या. अशा बँकांना विनंती केल्यानंतर त्या तयार झाल्या.
हेही वाचा - टेन्शन नॉट! UPI, IMPS बँक ट्रान्सफर फेल झालं? असं मिळवा रिफंड
‘आयएनजी वैश्य’ या बँकेने नोंदणी केल्यानंतर लवकरच एचडीएफसी बँकेनेही त्यांच्यावर विश्वास दाखवला. पुढे हा विश्वास वाढत गेला. अधिल म्हणतात, ‘पहिले पाऊल टाकणे खरेच कठीण असते. पण एकदा का तुम्ही पहिले पाऊल टाकले, की पुढचे थोडे सोपे होत जाते. आमच्या बाबतीतही अगदी तसेच झाले. पहिल्या बँकेची नोंदणी झाल्यानंतर आम्हाला इतर बँकांची नोंदणी करून घेणे सोपे झाले.’ दरवर्षी वाढत असणाऱ्या या कंपनीचा मागील वर्षीचा एकूण महसूल १११.७ कोटी रुपये होता. तसेच कंपनीत हजारहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.