विद्यार्थी असताना आली अडचण अन् थेट कंपनीच केली सुरू, योगेशचा प्रेरणादायी प्रवास

स्वतःची कंपनी स्थापन करुन त्याने आतापर्यंत अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी या देशांना एफडीएम प्रिटींग टेक्नॉलॉजीचे रॉ मटेरियल व पार्ट पुरविले आहेत.
आयप्रो थ्रीडी टेक्नॉलॉजी स्टार्ट-अप योगेश पवार यांनी सुरु केले आहे.
आयप्रो थ्रीडी टेक्नॉलॉजी स्टार्ट-अप योगेश पवार यांनी सुरु केले आहे.
Updated on

औरंगाबाद : गरज ही शोधाची जननी असे म्हटले जाते. यातूनच अनेक नवनवे शोध लागल्याची शेकडो उदाहरणेही आहेत. असेच एक उदाहरण आहे औरंगाबादेतील योगेश पवार (Entrepreneur Yogesh Pawar) या तरुणाचे. त्याला बी.टेक. अंतिम वर्षाच्या प्रोजेक्‍टसाठी प्लॅस्टिक पार्टची गरज होती. प्रत्येक प्लॅस्टीक मोल्ड करुन घ्यायचे तर खूप खर्चिक होते. त्यामुळे मेटलचे पार्ट लावून त्याने अंतिम वर्षाचे प्रोजेक्टचे काम पूर्ण केले. मात्र, इथे तो थांबला नाही. यावर उपाय काढायचे ठरवले. विद्यार्थी म्हणून आलेल्या अडचणींवर त्याने अभ्यास केला. शोधाशोध केल्यानंतर एफडीएम थ्रीडी प्रिंटिंग यासारख्या विविध आठ टेक्‍नॉलॉजी त्याला कळाल्या. याच क्षेत्रात करिअर करायचे ठरवून त्याने ‘आयप्रो थ्रीडी टेक्नॉलॉजी एलएलपी हे स्टार्टअप’ (Ipro 3 D Technology LLP Starts Up) सुरु केले. स्वतःची कंपनी स्थापन करुन त्याने आतापर्यंत अमेरिका (America), ब्रिटन (Britain), कॅनडा (Canada), जर्मनी (Germany) या देशांना एफडीएम प्रिटींग टेक्नॉलॉजीचे रॉ मटेरियल व पार्ट पुरविले आहेत. (Success Story Of Ipro 3 D Technology Founder Yogesh Pawar)

आयप्रो थ्रीडी टेक्नॉलॉजी स्टार्ट-अप योगेश पवार यांनी सुरु केले आहे.
केंद्र सरकारने व्हेंटिलेटरच्या नावाने चक्क 'डब्बे' पाठवलेत का? इम्तियाज जलीलांचा सवाल
आयप्रो ३ डी
आयप्रो ३ डी

अडचणीतून सुचली कल्पना

योगेश पवार हा मूळचा सांगोला (ता. पंढरपूर, सोलापूर) येथील आहे. आई-वडील दोघेही डॉक्‍टर आहेत. योगेशचा जन्म औरंगाबादचाच. लिटिल फ्लॉवर स्कूलला दहावीपर्यंत, नंतर बारावीपर्यंत देवगिरी महाविद्यालयात त्याने शिक्षण घेतले. यानंतर एमआयटी बी.टेक. मेकॅनिकलला प्रवेश घेतला. २०१२ ते १६ दरम्यान पदवी शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान अंतिम वर्षाच्या प्रोजेक्‍टवर काम करत असताना मोल्ड करण्यासाठी प्लॅस्टिक कंपनीत गेला. पण तसा पार्ट करायचा तर प्रत्येक प्लॅस्टिक मोल्ड पार्ट बनविण्यासाठी खर्च येईल असे त्याला तेथील कंपनीने सांगितले. एवढा खर्च शक्‍य नसल्याने योगेशने मेटलचा पार्ट करून त्यावेळी आपले प्रोजेक्टचे काम पूर्ण केले. बिझनेस सुरु झाल्यानंतर एक वर्षाने योगेशने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲडीटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग हा कोर्स पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पूर्ण केला. यासोबत एमबीए इन मार्केटींगचे शिक्षणही पूर्ण केले.

थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा अभ्यास

महाविद्यालयात असतांना आलेल्या अडचणीवर योगेशने उपाय शोधण्याचे ठरविले. अशी अडचण कोणाला येऊ नये किंवा त्यांच्या मदतीला आपण येऊ शकतो, असे काहीतरी करायची त्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली. शोधाशोध केल्यानंतर ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्‍चरिंग टेक्‍नॉलॉजीबद्दल कळाले. हे तंत्रज्ञान आता थ्रीडी प्रिंटिंग नावाने प्रचलित आहे. यातील फ्युजस डिपॉजिशन मॉडेलिंग (एफडीएम), स्टिरिओ लिथोग्राफी ऍपॅरेटस्‌ (एसएलए), सिलेक्‍टिव्ह लेजर सिंटरिंग (एसएलएस), डायरेक्‍ट मेटल लेजर सिंटरिंग (डीएमएलएस), डायरेक्‍ट मेटल डिपॉजिशन (डीएमडी), मल्टिजेट फ्युजन (एमजेएफ), पॉलिजेट, लॅमिनेटेड ऑब्जेक्‍ट मॅन्युफॅक्‍चरिंग (एलओएफ) या आठ टेक्‍नॉलॉजी कळाल्या. यातील एफडीएम, एसएलए, डीएमएलएस, एसएलएस या तंत्रज्ञानांद्वारे काम केले जाते. तर बंगलोरच्या युनिटतर्फे डीएमडी, मायक्रो एसएलएचा वापर केला जात आहे. याचा योगेशने अभ्यास करुन २०१७ मध्ये आयप्रो थ्रीडी टेक्नॉलॉजी एलएलपी या स्टार्टअपच्या माध्यमातून स्वतःची कंपनी अभी केली. स्टार्टअपसाठी त्याने जानेवारी २०१८ मध्ये मशीन ऑर्डर दिली होती. नेदरलॅंड येथून एसएलए आणि यूएसएहून एफडीएम मशीन मागवली. त्यानंतर आपल्या स्टार्टअपच्या माध्यमातून त्याने प्लॅस्टीक आणि मेटलमधून प्रोडक्ट देण्यास सुरवात केली. यामध्ये मेडीकल, इंडस्ट्री, आर्कीटेक्ट, ज्वेलरी, लाईफस्टाईल, गिफ्ट, न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट, पॅकेजिंग अशा विविध सेक्टरचा समावेश आहे.

आयप्रो थ्रीडी टेक्नॉलॉजी स्टार्ट-अप योगेश पवार यांनी सुरु केले आहे.
Corona Updates : मराठवाड्यात नवे साडेतीन हजार कोरोनाबाधित, १०३ जणांचा मृत्यू

पहिला ग्राहकही मिळाला विद्यार्थीच

योगेशला विद्यार्थी असताना जी अडचण आली, तशीच दुसऱ्या एकाला आली. त्यामुळे त्याचा पहिला ग्राहकदेखील हा एक विद्यार्थीच होता. त्या विद्यार्थ्याच्या प्रोजेक्‍टला लागणाऱ्या प्लॅस्टिक मोल्डचा खर्च ३० ते ४० हजार रुपये येणार होता, तो पार्ट थ्रीडी प्रिंटिंगद्वारे पॉलिप्रोफिलीन मटेरियलमध्ये अवघ्या ४०० रुपयांत मिळाला. योगेशने आपल्या कंपनीतर्फे आतापर्यंत हजारो पार्ट बनविले आहेत. सुरवातीला ग्राहक जेव्हा मागणी करायचे, तेव्हा हे विदाऊट मोल्ड प्लॅस्टिक पार्ट बनू शकत नाहीत, असे म्हणायचे; मात्र बनवून दिल्यानंतरच त्यांचा विश्‍वास बसला. लोकांना पटल्यानंतर लगेच दुसरे जॉबही मिळाले.

वेळ आणि पैशांची बचत

योगेश पवार यांनी आपल्या आयप्रो थ्री डी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून क्रीटीकल पार्ट सुद्धा तयार केले. यामध्ये आयडीया टु प्रॉडक्ट तयार करण्यासाठी खुप कमी वेळ लागतो. साधरणपणे जे काम पंधरा ते वीस दिवसात पूर्ण होतात ते काम योगेश आयप्रो थ्री डी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काही तासातच करतो. पूर्वी मोल्ड बनवून पार्ट तयार केले जात होते. त्याला खूप खर्च येतो. आता या टेक्नॉलॉजीमुळे विनामोल्ड पार्ट बनतात. मेडीकलचा विचार केला तर एखाद्याच्या पायाला फ्रॅक्चर असेल तर त्याचे सिटीस्कॅन करून तपासले जाते. मात्र, या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ते बघितले तर फ्रॅक्चर किती? कसे आहे? हे अतिशय सूक्ष्म पद्धतीने बघून त्यानुसार डॉक्टरांना पुढील उपचार करतात येतात. ज्वेलरी आणि डेंटलचा विचार केला तर या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मास्टर पॅटर्न तयार करता येतो.

देश विदेशात दिली टेक्नॉलॉजी

योगेश पवार यांनी आतापर्यंत चार देशांना एफडीएम प्रिटींग टेक्नॉलॉजीचे रॉ मटेरियल व पार्ट निर्यात केले. यामध्ये अमेरिका, युके, कॅनडा, जर्मनीचा समावेश आहे. त्यासोबत त्यांनी देशातील दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, बेंगळुरु, कोलाकाता, इंदूर, गुरुग्राम, हरियाणा, गोवा येथे आपली टेक्नॉलॉजी दिली आहे. सध्या त्यांना अनेक इंडस्ट्रीमधून ऑर्डर येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.