देशातल्या आघाडीवरच्या ई-काॅमर्स प्लॅटफाॅर्म सातत्यानं समाजातल्या दुर्लक्षित घटकांना बळ देण्याचे काम करतो आहे. आपल्या विविध योजनांच्या माध्यमातून फ्लिपकार्टने असंख्य उद्योग आणि व्यापाऱ्यांना आपल्या उत्पन्नात वाढ करुन स्वावलंबी होण्याची संधी फ्लिपकार्ट देत असते.
देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले व्यापारी, लघू-मध्यम आणि छोटे उद्योजक, हस्तकला क्षेत्रातले कलाकार आणि किराणा दुकानदार यांच्या मुल्यवर्धनाचा वसा फ्लिपकार्टने (Flipkart) घेतला आहे.फ्लिपकार्टवर आजमितीला चार लाख वीस हजारांहून विक्रेत्यांनी (Sellers) स्थान मिळवले आहे. या आॅनलाईल प्लॅटफाॅर्मने या सर्वांना आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचे बळ दिले आहे. देशाच्या सामाजिक आणि आर्थिक वाढीला (Economic Growth) फ्लिपकार्टमुळे चालना मिळाली आहे. आपल्या कुटुंबाची आणि घराची काळजी घेणाऱ्या गृहिणींनाही आपली स्वप्नं पूर्ण करण्याचे बळ फ्लिपकार्टमुळे मिळाले आहे. (Success Story of traders joined with Flipkart)
फ्लिपकार्टने आपल्या प्लॅटफाॅर्मच्या माध्यमातून २०१९ मध्ये किराणा विक्रीला सुरुवात केली. आज फ्लिपकार्ट या क्षेत्रात सर्वात आघाडीवरची कंपनी बनली आहे. आज सुमारे एक लाख किराणा व्यापारी फ्लिपकार्टशी जोडले गेले आहेत. देशभरात फ्लिपकार्टकडून केल्या जाणाऱ्या डिलिव्हरींमध्ये किराणा मालाच्या ३० टक्क्यांहून अधिक डिलिव्हरींचा वाटा आहे. यात जनरल स्टोअर्स, ब्युटी पार्लर्स, गोदामे यांच्यासह स्थानिक व्यवसायांचाही समावेश आहे.
किराणा उद्योगांनी नेटवर्कमध्ये यावे यासाठी फ्लिपकार्ट सातत्याने प्रयत्नशील असते. या मालाच्या डिलिव्हरी विनाअडथळा व्हाव्यात यासाठी फ्लिपकार्टकडून तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याचेही पाठबळ दिले जाते. गेल्या वर्षात उत्सवांच्या काळात फ्लिपकार्टकडून मार्गदर्शन मिळालेल्या किराणा पार्टनर्सकडून दहा लाखांहून अधिक डिलिव्हरी देशाच्या विविध भागात करण्यात आल्या आहेत. यातून अनेक नव्या यशोगाथाही समोर आल्या आहेत.
महाराष्ट्रातले काही उद्योजक आणि किराणा आस्थापनांच्या काही यशोगाथा इथे देत आहोत.
प्राची पटवर्धन यांनी दहा वर्ष अत्यंत तणावाचे वातावरण असलेल्या आयटी उद्योगात व्यतित केली. आपल्या पतीकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे त्यांनी आयटीमधली नोकरी सोडून आर्टिफिशिअल ज्वेलरीचा व्यवसाय सुरु केला. फ्लिपकार्टमुळे आज त्या सुखी आणि आनंदी जीवन व्यतित करत आहेत.
प्राची यांना उद्योजक बनण्याची अनेक वर्षांची इच्छा होती. हा प्रवास सोपा नाही, याची जाणीव त्यांना होती. त्या सांगतात "आपण ज्वेलरी क्षेत्रात उतरु शकतो हे जाणून मी ग्राहकांच्या आवडी निवडी शोधल्या. पण हे पुरेसे नव्हते म्हणून मी बाजारपेठेचा अभ्यास करायला सुरुवात केली,''
सुरुवातीच्या काळात प्राची यांनी नोंदणीची गरज नसलेल्या एका ई-काॅमर्स प्लॅटफाॅर्मच्या माध्यमातून आपली ज्वेलरी GirlZFashion या नावाखाली आॅनलाईन विकायला सुरुवात केली. मात्र, आपल्याला फ्लिपकार्टसारख्या विश्वासार्ह आणि प्रचंड व्याप्ती असलेल्या प्लॅटफाॅर्मची गरज असल्याचे त्यांना काही काळातच लक्षात आले. फ्लिपकार्टवर त्यांच्या उद्योगाची अत्यंत सहजरित्या नोंदणी झाली फ्लिपकार्टच्या टीमच्या सहाय्याने त्यांनी कॅटलाॅग लिस्टिंगचे कामही विनाअडथळा पूर्ण केले.
पुण्यातून चालविला जाणारा GirlZFashion हा उद्योग बांगड्या, कर्णभूषणे, नेकलेस अशी विविध पद्धतीची ज्वेलरी उत्पादित करते. आज प्राची यांच्या एकूण उलाढालीपैकी ८५ टक्क्यांहून अधिक उलाढाल आॅनलाईन रिटेल प्लॅटफाॅर्मच्या माध्यमातून होते.
फ्लिपकार्टसारख्या आॅनलाईच्या माध्यमातून तुम्ही काही काळातच देशपातळीवर जाऊन पोहोचता हा अनुभव प्राची यांना लवकरच आला. नोंदणीपासून अन्य तांत्रिक अडचणी दूर करणाऱ्या फ्लिपकार्टच्या माध्यमातून मला एक विश्वासू भागिदार मिळाला, असे प्राची सांगतात.
२०१४-२०१५ हे वर्ष प्राची यांच्या दृष्टीने शिकण्याचा एक टप्पा होता. आता GirlZFashion एका व्यक्तीने सुरु केलेल्या उद्योगाच्या पुढे गेला आहे. या उद्योगात आता तीन सदस्य झाले आहेत. "आम्ही अजून बाल्यावस्थेत आहोत पण आमच्या दरवर्षीच्या नफ्यात टप्प्याटप्प्याने वाढ होत आहे,'' असे प्राची सांगतात.
एक उद्योजक म्हणून प्राची यांना आपल्या ग्राहकांचे प्राधान्यक्रम आणि आवडीनिवडी, त्यांच्या भावना आणि नव्या उत्पादनांची गरज जाणून घेणे शक्य झाले. त्यातून त्यांच्या उद्योगाची व्याप्ती वाढली आणि नवनवी डिझाईन्स बनविण्याची प्रेरणा त्यातून त्यांना मिळाली.
व्यक्तीगत पातळीवरही प्राची यांना खूप फायदा झाला. त्या आता एक आई आणि एक यशस्वी उद्योजक अशा दुहेरी भूमिकांचा समतोल सहज राखू शकतात. एकूणच फ्लिपकार्टमुळे त्यांना आपल्या कुटुंबाच्या अधिक निकट जाण्याची संधी मिळाली आहे.
महाराष्ट्रातल्या नागपूर येथील किराणा व्यापारी राजू हरिभाऊ तितरमारे सुमारे तीस वर्षे पार्सल डिलिव्हरीचे काम करत होते. काही काळ त्यांनी केटरिंगचा छोटा व्यवसायही करुन पाहिला. आता त्यांना किराणा डिलिव्हरीच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळते आहे.
२०१९ मध्ये ते फ्लिपकार्टशी लाॅजिस्टिक पार्टनर म्हणून जोडले गेले. २०२० मध्ये त्यांनी फ्लिपकार्टच्या किराणा डिलिव्हरी विभागात काम करायला सुरुवात केली. आज दिवसभरात सुमारे ५० डिलिव्हरी करुन ते महिन्याला २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवतात.
या अतिरिक्त उत्पन्नातून त्यांना आपल्या कुटुंबाचे पालनपोषण अधिक चांगल्या पद्धतीने करता येते. कोरोना महामारीच्या काळात त्यांचा केटरिंग व्यवसाय ठप्प झाला होता. त्या काळात त्यांना उत्पन्नाचे अन्य साधन नव्हते. या काळात फ्लिपकार्टच्या किराणा डिलिव्हरीने तगवले.
''मी डिलिव्हरी क्षेत्रात ३० वर्षांहून अधिक काळ काम करतो आहे. फ्लिपकार्टच्या किराणा डिलिव्हरी योजनेमुळे मी चांगल्या प्रकारे तग धरु शकलो आहे. या योजनेत सहभागी झाल्यामुळे मी माझ्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकलो आणि माझे स्वतःचे घरही बांधू शकलो,'' असे राजू सांगतात.
नागपूरच्याच केशव जेठानंद खुशलानी या ४८ वर्षीय गृहस्थांनाही आॅनलाईन प्लॅटफाॅर्मचा फायदा झाला आहे. ते इलेक्ट्रिकल इंजिनिअर आणि उद्योजक आहेत. इलेक्ट्राॅनिक उत्पादने आॅनलाईन विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे.
आॅनलाईन विक्रीच्या माध्यमातून होणाऱ्या फायद्याच्या अनेकांच्या यशोगाथा ऐकल्यानंतर त्यांनी आपला आॅनलाईन व्यवसाय सुरु केला. ते आणि त्यांचा मुलगा राहुल यांनी २०१४ मध्ये दोन लाखांच्या गुंतवणुकीच्या सहाय्याने ते फ्लिपकार्टच्या समुहात सहभागी झाले.
"फ्लिपकार्टकडून दिले जाणारे अकाउंट मॅनेजरचे मार्गदर्शन, वेअरहाऊसिंगची सुविधा तसेच फ्लिपकार्टची देशभरातली व्याप्ती यामुळे माझ्या विक्रीत आणि उद्योगात चांगलीच वाढ झाली आहे. दरमहिन्याला मला चांगला नफा मिळतो आहे. आगामी वर्षांत माझ्या मालाची विक्री दुप्पट होईल, ही माझी इच्छा पूर्ण होईल, याची मला खात्री वाटते,'' असे केशव सांगतात.
अशाच यशोगाथा देशाच्या विविध भागातल्या उद्योजक व्यापाऱ्यांच्या आहेत. त्यांनी फ्लिपकार्टच्या विविध पार्टनरशीप प्रोग्रॅमच्या माध्यमातून आपली व्यवसाय वृद्धी केली आहे.
Edited By - Amit Golwalkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.