सरणाऱ्या वर्षात ‘क्रिप्टो करन्सी’ हा एक ‘बझ वर्ड’ (परवलीचा शब्द) झाला होता. समाज माध्यमे, वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्या यावर क्रिप्टो करन्सीवर वरचेवर चर्चा होताना दिसून येत आहे.
सरणाऱ्या वर्षात ‘क्रिप्टो करन्सी’ हा एक ‘बझ वर्ड’ (परवलीचा शब्द) झाला होता. समाज माध्यमे, वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्या यावर क्रिप्टो करन्सीवर वरचेवर चर्चा होताना दिसून येत आहे. यातील बहुतांश चर्चांमधून क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करणारे अल्पावधीत कसे मालामाल झाले आहे, हे प्रामुख्याने सांगितले जाते. परिणामत: सर्वसामान्य गुंतवणूकदारही आता अशी गुंतवणूक करण्याच्या विचारात असल्याचे दिसून येते. असे असले तरी क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करताना आवश्यक ती सावधगिरी बाळगली पाहिजे, कशी ती आता पाहू.
क्रिप्टो करन्सी ही शेअर बाजारापेक्षा जास्त ‘व्होलॅटाईल’ (अस्थिर) असल्याने यातील गुंतवणूक जास्त ‘रिस्की’ आहे. तसेच आज जरी यावर कोणत्याही मध्यवर्ती बँकेचे नियंत्रण नसले तरी भविष्यात असे नियंत्रण येणारच नाही, असे नाही आणि जर कधी नियंत्रण आले तर नेमकी काय अवस्था असेल, हे सांगता येत नाही. तसेच आज काही पेमेंट क्रिप्टो करन्सीत होत असले तरी भविष्यात पेमेटसाठी क्रिप्टो करन्सी नाकारली गेली तर समस्या उदभवू शकते. याची जाणीव ठेवूनच क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करणे योग्य राहील.
यातील एकूण अस्थिरता विचारात घेता एकदम मोठी गुंतवणूक करू नये, अगदी छोट्या रकमेने सुरवात करून अनुभव घ्यावा व त्यानुसार पुढे गुंतवणूक करावी.
आजकाल काही क्रिप्टो करन्सीची विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसते. म्हणून अशा करन्सीत लगेचच घाईने गुंतवणूक करू नये. चर्चिल्या जाणाऱ्या करन्सी गुंतवणुकीयोग्य असतीलच, असे नाही. त्यासाठी आधी थोडा अभ्यास करावा व त्यानुसार गुंतवणूक करावी.
आपल्याला झेपू शकेल इतका तोटा होईल हे गृहीत धरून गुंतवणूक करावी. केवळ ‘रिटर्न्स’ जास्त आहेत म्हणून मोठी रक्कम गुंतवू नये.
‘हॅकिंग’ची शक्यता विचारात घेऊन करन्सी वॉलेट विश्वासार्ह व खात्रीशीर असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने एक्स्चेंजशी निगडीत (लिंक) असलेले वॉलेट निवडावे.
तज्ज्ञांच्या मते, क्रिप्टो करन्सी हा एक ‘बबल’ (फुगा) असून, हा कधीही फुटू शकतो. त्यादृष्टीने सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
सध्या क्रिप्टो करन्सीचे वादळ उठले आहे. यात आपण अडकणार नाही, हे पाहणे आवश्यक आहे.
क्रिप्टो करन्सी ही गुंतवणुकीसाठी एक संधी आहे, ती गमावून चालणार नाही, या विचाराने यात गुंतवणूक न करता याबाबतची प्रथमिक माहिती, त्यात असलेली जोखीम, आपली जोखीमक्षमता व मिळणारा परतावा यांचा एकत्रित विचार करूनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.
आपल्या पोर्टफोलिओमध्ये ६ ते ७ टक्के इतकीच गुंतवणूक क्रिप्टो करन्सीत करावी.
एकाच क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक न करता किमान ३-४ करन्सीत गुंतवणूक केल्याने जोखीम कमी होऊ शकते.
थोडक्यात असे म्हणता येईल, की क्रिप्टो करन्सी हा नवा पर्याय गुंतवणुकीसाठी उपलब्ध झालेला असून, यातील जोखीम लक्षात घेऊन गुंतवणूक केल्यास अन्य पर्यायांपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो.
(लेखक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर- सीएफपी आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.