क्रिप्टो करन्सीवर ‘टीडीएस’, ३० टक्के प्राप्तिकराचा मोठा निर्णय

अर्थसंकल्प सादर करताना प्रथमच क्रिप्टो करन्सी व व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्सच्या व्यवहारांवर प्राप्तिकर आकारणीबाबत निर्णय घेण्यात आला व त्यानुसार यातील व्यवहारांतून मिळणाऱ्या उत्पन्नावर एक एप्रिल २०२२ पासून सरसकट ३० टक्के इतका प्राप्तिकर भरावा लागणार
TDS on Cryptocurrency | Cryptocurrency News Updates
TDS on Cryptocurrency | Cryptocurrency News Updatessakal
Updated on
Summary

अर्थसंकल्प सादर करताना प्रथमच क्रिप्टो करन्सी व व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्सच्या व्यवहारांवर प्राप्तिकर आकारणीबाबत निर्णय घेण्यात आला व त्यानुसार यातील व्यवहारांतून मिळणाऱ्या उत्पन्नावर एक एप्रिल २०२२ पासून सरसकट ३० टक्के इतका प्राप्तिकर भरावा लागणार

यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना प्रथमच क्रिप्टो करन्सी व व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्सच्या व्यवहारांवर प्राप्तिकर आकारणीबाबत निर्णय घेण्यात आला व त्यानुसार यातील व्यवहारांतून मिळणाऱ्या उत्पन्नावर एक एप्रिल २०२२ पासून सरसकट ३० टक्के इतका प्राप्तिकर भरावा लागणार आहे. आता एक जुलै २०२२ पासून उदगम करकपात (टीडीएस) सुद्धा करावी लागणार आहे व ही जबाबदारी जी व्यक्ती पेमेंट करणार आहे, तिची असणार आहे. याबाबत प्राप्तिकर खात्याने नुकतेच परिपत्रक काढून क्रिप्टो करन्सी, व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्स व नॉन फंजिबल टोकन यांतील होणाऱ्या खरेदी अथवा हस्तांतराच्या व्यवहारात ‘टीडीएस’ कसा असेल, याची तपशिलात माहिती दिली आहे. ती थोडक्यात पुढीलप्रमाणे... (Cryptocurrency News Updates)

क्रिप्टो करन्सी, व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्स व नॉन फंजिबल टोकन या व्यवहारांतील जो खरेदीदार असेल, त्याने व्यवहाराच्या रकमेच्या १ टक्का ‘टीडीएस’ करून उर्वरित रक्कम विक्री करणाऱ्यास द्यायची आहे व ‘टीडीएस’ प्रत्यक्ष पेमेंट करताना किंवा खात्यावर रक्कम जमा होताना करायची आहे. यात विक्रेता (सेलर) निवासी भारतीय असणे गरजेचे आहे, तर खरेदीदार निवासी भारतीय, अनिवासी भारतीय किंवा एक्स्चेंज/ब्रोकर असू शकेल. १ टक्का ‘टीडीएस’ आकारणी प्राप्तिकर कायदा १९६१ कलम १९४एस नुसार करायची आहे. जर खरेदीदाराचा ‘पॅन’ उपलब्ध नसेल, तर क्रिप्टो करन्सी, व्हर्च्युअल डिजिटल ॲसेट्स व नॉन फंजिबल टोकन ट्रान्सफर होताना २० टक्के इतकी करकपात करावी लागेल. जर खरेदीदाराने इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलेले नसेल, तर ५ टक्के ‘टीडीएस’ करावे लागेल. मात्र, ‘टीडीएस’ लागू होण्यासाठी-

खरेदीची रक्कम एकरकमी किंवा आर्थिक वर्षातील एकत्रित रु. ५०,००० पेक्षा जास्त असेल तर आणि खरेदीदार हा ‘स्पेसिफाइड पर्सन’ असेल तर...

जर खरेदीदार स्पेसिफाइड पर्सनव्यतिरिक्त असेल तर ही मर्यादा एकरकमी रु. १०,००० किंवा आर्थिक वर्षात एकत्रित रु. १०,००० पेक्षा जास्त असेल तर...

टीडीएस आकारणी ही जीएसटी व अन्य चार्गेस वगळून उरलेल्या रकमेवर केली जाईल.

खरेदीदारास ‘टॅन’ घेऊन दर तिमाहीस ‘टीडीएस रिटर्न’ फाईल करावे लागेल. जर व्यवहार आपापसात झाले आणि ब्रोकर किंवा एक्स्चेंज यांच्यामार्फत न झाल्यास खरेदीदारास ‘टीडीएस’ करावा लागतो. मात्र, जर दोघांतील व्यवहार परस्पर न होता ब्रोकर किंवा एक्स्चेंजमार्फत झाल्यास असा ‘टीडीएस’ ब्रोकर/एक्स्चेंजमार्फत केला जाईल व उर्वरित रक्कम सेलरला ब्रोकर/एक्स्चेंजमार्फत दिली जाईल. (TDS on Cryptocurrency)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.