IPO: वाईन निर्माते 'सुला'चा आयपीओ येण्याची शक्यता

सुला विनयार्ड्स (Sula Vineyards) लवकरच त्यांचा 1200-1400 कोटी रुपयांचा IPO बाजारात आणू शकते अशी शक्यता आहे.
Sula Vineyards
Sula VineyardsSakal
Updated on

सुला विनयार्ड्स (Sula Vineyards) लवकरच त्यांचा 1200-1400 कोटी रुपयांचा IPO बाजारात आणू शकते अशी शक्यता आहे. द इकॉनॉमिक टाईम्सने ही बातमी दिली आहे. नाशिकमधील वाईन निर्माते सुला विनयार्ड्सने (Sula Vineyards) आयआयएफएल, कोटक महिंद्रा कॅपिटल आणि सीएलएसए यांना त्यांच्या प्रस्तावित आयपीओसाठी बँकर म्हणून नियुक्त केले आहे. लवकरच कंपनी सेबीकडे आयपीओ अर्ज दाखल करू शकते. पण त्याचवेळी सुला वाईनयार्ड्सने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

या आयपीओमध्ये शेअर्सच्या फ्रेश इश्यूसह ऑफर फॉर सेल असेल, ज्या अंतर्गत कंपनीचे सर्व गुंतवणूकदार त्यांचे शेअर्स विकू शकतील. DSG कंझ्युमर पार्टनर्स, Everstone Capital, Saama Capital आणि Verlinvest यांनी कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. Verlinvest ने 2010 पासून अनेक टप्प्यांत सुला विनयार्ड्समध्ये 7 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.

Sula Vineyards
100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर देईल तुम्हाला तगडा परतावा...

सुला वाईनयार्ड्सने 1999 मध्ये पहिली वायनरी स्थापन केली. कंपनीचे सध्या 13 पेक्षा जास्त ब्रँड आहेत. कंपनी 14 राज्यांमध्ये पसरलेल्या मोठ्या डिस्ट्रीब्यूशन नेटवर्कद्वारे त्यांची विक्री करते. कंपनीकडे 2000 एकरपेक्षा जास्त वाईन यार्ड्स आहेत. यातील बहुतांश द्राक्षबागा कंत्राटावर (On Contract) घेण्यात आल्या आहेत. या द्राक्षबागा महाराष्ट्रातील नाशिक, दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागात आहेत. आर्थिक वर्ष 2022 मध्ये सुला वाईनयार्ड्सचा देशांतर्गत बाजारपेठेत 52 टक्के हिस्सा होता.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.