स्विस बँकेतील माहिती उघड, नेतेमंडळींसह जगभरातील श्रीमंतांमध्ये खळबळ

स्विस बँकेतील छुप्या कोट्यवधी रुपयांवरून अनेक राजकीय नेते चर्चेत आले
swiss bank
swiss banksakal
Updated on

नवी दिल्ली : जगभरात स्वित्झर्लंड या देशाची ओळख त्यांच्याकडून सर्वाधिक सुरक्षित अशा बँकिंग प्रणालीसाठी आहे. स्विस बँकेतील छुप्या कोट्यवधी रुपयांवरून अनेक राजकीय नेते आतापर्यंत चर्चेत आले आहेत. आता पुन्हा एकदा स्विझर्लंडमधील 'क्रेडिट सुईस' बँकेचा बँकिंग संबंधित गोपनीय माहिती (डेटा) लिक झाली आहे आणि त्यातून या बँकेत भ्रष्ट राजकीय नेते, गुन्हेगार अशांची खाती असल्याचे समोर आले. या वृत्तामुळे जगभरातील श्रीमंतांमध्ये खळबळ उडाली आहे.

क्रेडिट सुईस बँकेच्या ग्राहकांची संख्या जवळपास १५ लाख आहे. स्वित्झर्लंडमधील ही दुसरी सर्वात मोठी बँक आहे. सध्या या बँकेच्या खातेदारांची एक यादी समोर आली आहे, ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या बँक खात्यांमध्ये जवळपास १०० अब्ज डॉलर असल्याची नोंद आहे. स्विस बँकेमध्ये जगभरातील श्रीमंतांची खाती असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. यानंतर पुन्हा एकदा जर्मनीतील एक वृत्तपत्राने आपल्या अहवालात या बँकेतील भ्रष्ट ग्राहकांसंबंधित माहिती दिली आहे. एका व्यक्तीने १९४० ते २०१० या दरम्यानची बँक खात्यासंबंधित माहिती एका जर्मन वृत्तपत्राला दिली होती. या वृत्तपत्राने ही माहिती न्यूयॉर्क टाईम्ससहित अन्य काही वृत्तपत्र संस्थांना दिली होती. या माहितीमध्ये परदेशी ग्राहकांच्या १८ हजार बँक खात्यांची माहिती आहे. यातून स्विस बँकिंग प्रणालीमधील अनेक बाबी पुढे आल्या.

वृत्तपत्र संस्थांच्या १६० बातमीदारांनी बँकिंगसंबंधित या माहितीचा खोलवर अभ्यास केल्यानंतर अनेक खळबळजनक माहिती बाहेर आली. त्यातून उघड झाले की, या बँकेत अनेक भ्रष्ट राजकारणी, गुन्हेगार, हुकूमशाह, गुप्तचर अधिकारी आणि काही संशयित व्यक्तींची बँक खाती आहेत. एका गुगल सर्चवर या व्यक्तींची सर्व कारस्थाने समोर येतील, अशा व्यक्तींची खाती या बँकेत आहेत. अहवालानुसार, क्रेडिट सुईस या बँकेत ज्या लोकांचे अब्जावधी रुपये जमा आहेत, त्यात जॉर्डनचे किंग अब्दुल्ला द्वितीय आणि इजिप्तचे माजी राष्ट्रपती होस्नी मुबारक यांच्या मुलाचे नाव आहे. याशिवाय पाकिस्तानातील एका गुप्तचर प्रमुखाच्या मुलाच्या नावाचा समावेश यात आहे, ज्याने १९८० च्या दशकात अफगाणिस्तानातील मुजाहिदीनला अब्जावधी डॉलरची मदत केली होती. या यादीत काही श्रीमंत भारतीयांची नावे असण्याची शक्यता आहे.

अनेक खाती बंद

वृत्तसंस्थाद्वारे प्रकाशित झालेल्या या अहवालानंतर क्रेडिट सुईस बँकेने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. बँकेने स्पष्ट केली की, आम्ही अशा अनेक खात्यांची पडताळणी केली आहे, ज्यावरून प्रश्न उपस्थित केले गेले. ज्या खात्यांची पडताळणी केली, त्यातील ९० टक्के खाती मीडियाच्या तपासणीपूर्वीच बंद झाली आहेत किंवा बंद होण्याच्या प्रक्रियेत आहेत; तर यातील ६० टक्के खाती २०१५ पूर्वीच बंद झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.