Share Market : भारतीय ऑटो पार्ट्स निर्मात्या टॅलब्रोस ऑटोमॅटिव्ह कंपोनंट्सचे शेअर्स गेल्या काही दिवसांपासून तेजी दिसत आहे. त्यामुळेच दिग्गज गुंतवणुकदार या शेअरकडे वळत असल्याचे दिसत आहे. दिग्गज गुंतवणुकदार डॉली खन्ना यांनीही टॅलब्रोसच्या शेअर्समध्ये हिस्सेदारी वाढवली आहे. आधी त्यांची हिस्सेदारी 1.1% होती जी आता वाढून 1.2% झाली आहे. याचा अर्थ खन्ना यांच्याकडे या कंपनीचे 1,50,215 इक्विटी शेअर्स आहेत.
टॅलब्रोस ऑटोमॅटिव्ह कंपोनेंट्सचे (Talbros Automative Components) शेअर्स बीएसईवर सुमारे 5 टक्के वाढीसह 490.05 रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या पाच दिवसांत तो 10 टक्क्यांहून अधिक मजबूत झाला आहे.
मल्टीबॅगर स्टॉक
टॅल्ब्रोस ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट्स कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत. ही कंपनी प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने, दुचाकी, तीनचाकी वाहने, कृषी यंत्रे, ऑफ-लोडर्स आणि औद्योगिक वाहनांसाठी घटक तयार करतात. 1 ऑक्टोबर 2004 रोजी त्याची किंमत 20.57 रुपये होती, जी आता 490.05 रुपये झाली आहे, म्हणजेच 18 वर्षांत गुंतवणूकदारांची संपत्ती जवळपास 24 पटीने वाढले आहे.
18 जानेवारी 2022 रोजी त्याचे शेअर्स 654.90 रुपयांवर होते, जे एका वर्षातील उच्चांक आहे. पण, त्यानंतर किंमत घसरली आणि ती सध्या सुमारे 25% डिस्काउंटवर व्यवहार करत आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.