गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीपेक्षा 68 टक्क्यांपर्यंत मजबूत परतावा मिळू शकतो.
शेअर बाजारात गुंतवणूकदारांची नजर कायम टाटा ग्रुपच्या शेअर्सवर असते. याचे कारण टाटा ग्रुपमध्ये अनेक दर्जेदार स्टॉक्स आहेत, जे गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर्स ठरले आहेत. अलीकडेच, टाटा कम्युनिकेशन्स (Tata Communications) आणि टाटा मेटालिक्स (Tata Metaliks) या टाटा ग्रुपच्या दूरसंचार कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. निकालानंतर ब्रोकरेज हाऊसने या शेअर्सवर खरेदीचा सल्ला दिला आहे. यामध्ये, गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीपेक्षा 68 टक्क्यांपर्यंत मजबूत परतावा मिळू शकतो.
टाटा मेटलिक्स (Tata Metaliks)
ब्रोकरेज फर्म मोनार्क कॅपिटलने (MONACRH) Tata Metalynx स्टॉकवर खरेदी सल्ला कायम ठेवला आहे. पण, टारगेट पूर्वीच्या 1330 रुपयांवरून 1180 रुपये करण्यात आली आहे. 25 जुलै 2022 रोजी कंपनीचा शेअर 702 रुपयांवर बंद झाला. या किंमतीपासून, गुंतवणूकदारांना सुमारे 68 टक्के मजबूत परतावा मिळू शकतो.
कंपनीला भविष्यात मजबूत रिकव्हरी अपेक्षित असल्याचे ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे. उत्पन्नातील घट आणि मर्जरसह विविध कारणांमुळे टारगेट कमी करण्यात आले आहे. दुसऱ्या तिमाहीत (2QFY23) चांगली रिकव्हरी अपेक्षित आहे. कारण कोळशाच्या किमती कमी झाल्यामुळे प्रसार सुधारला आहे. तसेच टाटा मेटलिक्सच्या (Tata Metaliks) DI पाईप्ससाठी लॉन्ग टर्म एव्हरेज एबिटडा/टन असेल. स्टॉक त्याच्या DI पाईप पीअर ग्रुपमध्ये आउटपरफॉर्म करु शकतो.
टाटा कम्युनिकेशन्स (Tata Communications)
ब्रोकरेज फर्मने Emkay Research (Emkay) एप्रिल-जून 2022 तिमाही निकालानंतर टाटा कम्युनिकेशन्सच्या स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील 12 महिन्यांसाठी, 1210 रुपये टारगेट देण्यात आले आहे. 25 जुलै 2022 रोजी शेअरची किंमत 1055 वर बंद झाली. याचा अर्थ येत्या वर्षात या स्टॉकमध्ये सुमारे 15 टक्के चांगला परतावा मिळू शकतो.
कंपनीचे मार्जिन आऊटपरफॉर्म करत असल्याचे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. मात्र, रेवेन्यू ग्रोथवर दबाव आहे. टाटा कम्युनिकेशन्सने (Tata Communications) Q1FY23 मध्ये वार्षिक महसुलात अंदाजे 5.1 टक्के वाढ केली. डिजिटल प्लॅटफॉर्मवर कंपनीची वाढ 12.3 टक्के (yoy) आणि कोर कनेक्टिव्हिटी वाढ 3.6 टक्के आहे. यामुळे, डेटा सेगमेंटची वाढ वार्षिक आधारावर 7.6 टक्के झाली आहे. क्लाउड होस्टिंग आणि मीडिया सर्व्हिसेजमध्ये कंपनीची मजबूत वाढ झाली आहे.
कंपनीचे निव्वळ कर्ज जून 2022 च्या तिमाहीत 6130 कोटी रुपयांवर घसरले, जे Q4FY22 मध्ये 6740 कोटी रुपये होते. कॅपेक्स आणि ओपेक्समध्ये हळूहळू गती दिसून येईल, असा ब्रोकरेजचा विश्वास आहे. ज्यामुळे रेव्हेन्यू रिकव्हरीला सपोर्ट मिळेल.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.