टाटा करणार पाच ब्रँड्सची खरेदी? अंबानींच्या रिलायन्सला देणार टक्कर

टाटा मोठा व्यवहार करण्याच्या तयारीत
Tata
Tata esakal
Updated on

दिल्ली : टाटा समुहाची कंपनी टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड मोठा व्यवहार करण्याच्या तयारीत आहे. वास्तविक, टाटा कंझ्युमर पाच ब्रँड्स खरेदीसाठी चर्चा करित आहे. या माध्यमातून कंपनी कंझ्युमर गुड्स सेक्टरमध्ये आपली स्थिती मजबूत करु इच्छित आहे. ब्लूमबर्गच्या एका वृत्तात ही माहिती समोर आली आहे. वृत्तानुसार टाटा (Tata) कंझ्युमर प्रोडक्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुनील डिसूझा म्हणाले, की कंपनी टेटली चहा (Tetley) आणि एट ऑ'क्लाॅक (Eight O'Clock) काॅफी विकते. (Tata Consumer Products May Buy Five Brands, Says Bloomberg Report)

Tata
टाटा ग्रुपच्या या दोन शेअर्सचा 2 वर्षांत 340% परतावा दिला...

आता इतर कंपन्यांशी जोडून घेण्यास गंभीरतेने विचार करित आहे. मात्र डिसूझा यांनी त्या ब्रँड्सची माहिती दिली नाही. टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्सची (Tata Consumer Products) स्थापना २०२० मध्ये झाली होती. तिने बाटली बंद पाणी कंपनी नरिशको बेव्हरेजेस आणि खाद्य ब्रँड सोलफुल या सारख्या कंपन्यांमधील हिस्सा खरेदी करुन आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे.

रिलायन्सला देणार टक्कर

टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्सला मुकेश अंबानी यांची रिलायन्स रिटेल व्यतिरिक्त दिग्गज कंपनी युनिलिव्हरशी स्पर्धा करावी लागेल. आगामी दिवसांमध्ये रिलायन्स डझनभर छोटे किराणा आणि बिगर खाद्य ब्रँड्सचे अधिग्रहण करु शकते. रिलायन्सला ६.५ अब्ज डाॅलर कंझ्यमुर गुड्सच्या व्यवसायाचे लक्ष्य आहे.

Tata
रतन टाटा यांची भावनिक पोस्ट...'त्या' जखमा कधीच भरणार नाहीत

कठीण काळात व्यवसाय विस्तार

जागतिक पातळीवर चलनवाढीमुळे कंपन्यांच्या अडचणी वाढ होत असताना टाटाने विस्ताराची नवीन योजना आखली आहे. युक्रेनमध्ये युद्ध, राष्ट्रीय कृषी, वस्तुंच्या निर्यातीवर बंदी आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यामुळे इनपुट खर्च वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.