TATA Group IPO : देशातील सर्वात मोठ्या ग्रुपपैकी एक अर्थातच टाटा ग्रुप 19 वर्षांनंतर आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. टाटा मोटर्सची उपकंपनी टाटा टेक्नॉलॉजीज या आयपीओद्वारे 3,500 ते 4,000 कोटी रुपये उभारू शकतात. यासाठी कंपनीचे व्हॅल्यूएशन 16,200 ते 20,000 कोटी रुपयांपर्यंत असू शकते.
टाटा ग्रुपने या आयपीओसाठी काम सुरू केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनी दोन ऍडव्हायझर्ससोबत काम करत आहे. यासोबतच आणखी एक ऍडव्हायझर नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या महिन्यात टाटा मोटर्सच्या बोर्डाने टाटा टेकमधील काही हिस्सेदारी आयपीओद्वारे विकण्याचा प्रस्ताव मंजूर केला, तेव्हापासून कंपनीचे अनलिस्टेड शेअर्स सातत्याने वाढत आहेत.
टाटा ग्रुपने अद्याप या आयपीओसाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. टाटा सन्सचे विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळातील टाटा समूहाचा हा पहिला आयपीओअसेल. टाटा टेक्नॉलॉजीज ही डिजिटल, इंजिनिअरिंग आणि टेकनिकल सर्व्हिस सेक्टरमधील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. यामध्ये टाटा मोटर्सचा 74.42 टक्के हिस्सा आहे. त्याचप्रमाणे, 8.96 टक्के हिस्सा अल्फा टीसीकडे आणि 4.48 टक्के टाटा कॅपिटल ग्रोथ फंडकडे आहे.
याआधी टाटा ग्रुपच्या कंपनीचा आयपीओ 19 वर्षांपूर्वी आला होता. टाटा ग्रुपने 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा (TCS) आयपीओ आणला होता. टीसीएस ही आजच्या घडीला देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.