'टाटा'च्या 'या' शेअरची उड्डाणे! वर्षात वाढला 3022 टक्‍क्‍यांनी

टाटा ग्रुपच्या 'या' शेअरची 10 सत्रांपासून उड्डाणे! वर्षात वाढला 3022 टक्‍क्‍यांनी
tata group
tata groupSakal
Updated on
Summary

टाटाचा हा शेअर सलग दहाव्या दिवशीही व आज वर्षाच्या तिसऱ्या दिवसातही अपर सर्किटमध्ये आहे.

टाटा समूहाची (Tata Group) कंपनी Tata Teleservices Maharashtra Limited (TTML) गेल्या एक वर्षापासून आपल्या गुंतवणूकदारांना (Investors) गडगंज बनवत आहे. 10 सत्रांपासून हा शेअर (Share) उड्डाणे भरत आहे. टाटाचा हा शेअर सलग दहाव्या दिवशीही व आज वर्षाच्या तिसऱ्या दिवसातही अपर सर्किटमध्ये (Upper Circuit) आहे. आज टीटीएमएलचा शेअर 4.99 टक्‍क्‍यांनी वाढून 238.80 रुपयांवर पोहोचला आहे. 23 डिसेंबर रोजी तो 154.10 रुपयांवर बंद झाला. त्याच वेळी, 2 डिसेंबर रोजी शेअर 124.05 रुपयांवर बंद झाला. मागील वर्षी 2 जुलै रोजी हा स्टॉक 49.10 रुपयांवर होता आणि आता 238.80 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच अवघ्या 6 महिन्यांत या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 486 टक्के परतावा दिला आहे. (Tata Group's this stock rose 3022 percent in one year)

tata group
SBI ग्राहकांची चांदी! आता 5 लाखांपर्यंतचे ऑनलाइन IMPS व्यवहार फ्री

गुंतवणूकदारांना देतोय मल्टिबॅगर परतावा (Multibagger Returns)

टाटा टेलिसर्व्हिसेसच्या स्टॉकच्या 1 आणि 5 वर्षांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, गुंतवणूकदारांसाठी ते मल्टिबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे 3022 टक्के वाढ झाली आहे. एका वर्षात हा स्टॉक 7.90 रुपयांवरून 238.80 रुपयांवर गेला आहे. म्हणजेच, एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी त्यात एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे एक लाख आता सुमारे 31 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते.

tata group
Covidची ऐशीतैशी! भारतीयांनी तोडला सोने खरेदीत दहा वर्षांचा रेकॉर्ड!

काय करते TTML?

TTML ही Tata Teleservices ची उपकंपनी आहे. ही कंपनी तिच्या सेगमेंटमध्ये मार्केट (Segment Market Leader)) लीडर आहे. कंपनी व्हॉईस, डेटा सेवा पुरवते. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठी नावे आहेत. बाजारातील जाणकारांच्या मते, गेल्या महिन्यात कंपनीने स्मार्ट इंटरनेट (Smart Internet) आधारित सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांसाठी सेवा सुरू केली आहे. कंपन्यांना जलद इंटरनेट आणि ऑप्टिमाइझ्ड नियंत्रणासह क्‍लाउड आधारित सुरक्षा सेवा मिळत असल्याने याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. क्‍लाउड आधारित सुरक्षा (Cloud Based Security) हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, जे डेटा सुरक्षित ठेवेल. जे व्यवसाय डिजिटल तत्त्वावर चालत आहेत, त्यांना ही लीज लाइन खूप मदत करेल. यामध्ये सर्व प्रकारच्या सायबर फ्रॉडपासून सुरक्षितता अंतर्भूत करण्यात आली असून, त्यासोबतच वेगवान इंटरनेट सुविधाही देण्यात आली आहे.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती केवळ शेअर परफॉर्मन्ससंबंधी आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्‍याच्या अधीन आहे आणि गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.